शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:19 IST

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गेल्या शनिवार (दि. २६) अंबड परिसरातील रामकृष्णनगर भागात राहणारा तरुण नरसीराम समनाजी चौधरी ...

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गेल्या शनिवार (दि. २६) अंबड परिसरातील रामकृष्णनगर भागात राहणारा तरुण नरसीराम समनाजी चौधरी (३०) याने राहत्या घराच्या छताला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी चौधरी यांनी चिठ्ठी लिहिली होती. या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी चौधरी यांना आत्महत्येस कारणीभूत ठरलेले चौघे संशयित आशिष शहा, हरीश शहा (दोघे रा. मुंबई), शिरीष (पूर्ण नाव माहीत नाही) व मोहन जोशी (रा. नाशिक) यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. चौधरी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना आढळून आली होती. यामध्ये वरील संशयित चौघांनी पैशाच्या देवाणघेवाणीवरून मानसिक त्रास देत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा मजकूर चिठ्ठीत लिहिला असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रारंभी अंबड पोलीस ठाण्यात या घटनेप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. यानंतर चिठ्ठीतील मजकुराची शहानिशा करत पोलिसांनी त्यामध्ये उल्लेख असलेल्या चौघा संशयित व्यक्तींविरुध्द गुन्हा नोंदविला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर करीत आहेत.