शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
6
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
7
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
8
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
9
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
10
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
11
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
12
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
13
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
14
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
15
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
17
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
18
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
19
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
20
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका

शहर परिसरातून  चार दुचाकींची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:13 IST

शहरातील दुचाकी चोरीला आळा घालण्यास पोलिसांना अपयश येत असून, दुचाकी चोरीचे सत्र सुरूच आहे़ शहरातील विविध भागातून दुचाकी चोरट्यांनी दोन अ‍ॅक्टिवा, प्लेझर व सीबीझेड अशा चार दुचाकी चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़

नाशिक : शहरातील दुचाकी चोरीला आळा घालण्यास पोलिसांना अपयश येत असून, दुचाकी चोरीचे सत्र सुरूच आहे़ शहरातील विविध भागातून दुचाकी चोरट्यांनी दोन अ‍ॅक्टिवा, प्लेझर व सीबीझेड अशा चार दुचाकी चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़  तपोवनरोड परिसरातील रहिवासी हेमलता मिलिंद बच्छाव (रा. कर्मा हाईट्स, तपोवनरोड) या नातेवाइकांना भेटण्यासाठी पखालरोड परिसरात गेल्या होत्या. त्यांनी आपली प्लेझर (एमएच १५, डीपी ८३००) दुचाकी इच्छामणी बंगल्यासमोर उभी केली असता चोरट्यांनी चोरून नेली़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात झाल्यानंतर पोलिसांनी रामवाडी येथील संशयित ईश्वर राजेंद्र गुरगुडे (१९ रा. रामवाडी) या युवकास ताब्यात घेतले आहे़  दुचाकी चोरीची दुसरी घटना फाळकेरोड परिसरात घडली़ अब्दुला हाफिस चिरागउद्दीन कोकणी (रा. गुलजार मेन्शन, फाळकेरोड) यांची अ‍ॅक्टिव्हा (एमएच १५, डीझेड ८६९२) दुचाकी चोरट्यांनी त्यांच्या घरासमोरून चोरून नेली़ याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दुचाकी चोरीची तिसरी घटना नाशिकरोड परिसरात घडली़ प्रकाश नारायण देशमुख (रा. हेरंब अपा. कुलकर्णी मंगल कार्यालयाजवळ) यांची अ‍ॅक्टिवा (एमएच १५, एफजी ३३२३) दुचाकी चोरट्यांनी वैष्णव हाईट इमारतीसमोरून चोरून नेली़ याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पंचवटीतील इंद्रकुंड परिसरातून दुचाकी चोरून नेल्याची चौथी घटना घडली़ राहुल चंद्रकांत गुजरे (रा. गंगोत्री अपा.) यांची सीबीझेड (एमएच ०३, एयू ०८८२) दुचाकी चोरट्यांनी सोसायटीच्या पार्किंगमधून चोरून नेली़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़