शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिविर इंजेक्शन विक्रीप्रकरणी चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:16 IST

पंचवटी : कोरोना रुग्णांना लागणारे रेमडेसिविर इंजेक्शन जादा दराने विक्री करून रुग्णांची आर्थिक लूटमार करणाऱ्या टोळीतील आणखी चौघा संशयितांचा ...

पंचवटी : कोरोना रुग्णांना लागणारे रेमडेसिविर इंजेक्शन जादा दराने विक्री करून रुग्णांची आर्थिक लूटमार करणाऱ्या टोळीतील आणखी चौघा संशयितांचा आडगाव पोलिसांनी पर्दाफाश केला असून, त्यांच्याकडून ६१ हजार रुपये किमतीचे सुमारे २० रेमडेसिविर इंजेक्शन जप्त केले आहेत. आडगाव पोलिसांनी इंजेक्शन विक्री करणाऱ्या टोळीतील तिघाजणांना पालघर जिल्ह्यातील वाडा येथून, तर एकाला नाशिक शहरातून ताब्यात घेतले आहे. चार दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासन, आडगाव पोलिसांनी संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईत तिघा नर्स आणि सिडकोतील मेडिकल दुकानात काम करणाऱ्या एका युवकासह चौघांना रेमडेसिविर इंजेक्शन काळ्या बाजारात जादा दराने विक्री केल्याप्रकरणी अटक करून दोन इंजेक्शन जप्त केले होते. आता एकूण या प्रकरणात पोलिसांनी तब्बल आठजणांना अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण सुमारे ६७ हजार रुपये किमतीचे २२ रेमडेसिविर इंजेक्शन जप्त केले आहे. रेमडेसिविर इंजेक्शन काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलेल्यात आतापर्यंत आडगाव पोलिसांनी केलेली शहरातील सर्वांत मोठी कारवाई असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

गेल्या गुरुवारी रात्री आडगाव शिवारात के. के. वाघ महाविद्यालयासमोर अन्न व औषध प्रशासन आणि आडगाव पोलिसांनी संयुक्त केलेल्या कारवाईत ५४ हजार रुपयांना दोन रेमडेसिविर इंजेक्शन विक्री करताना जागृती शरद शार्दुल, श्रुती रत्नाकर उबाळे या दोन नर्सला रंगेहात ताब्यात घेतले होते. त्यानंतर हे इंजेक्शन स्नेहल पगारे व कामेश बच्छाव यांना देत असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या होत्या, तर रेमडेसिविर इंजेक्शन विक्री करणाऱ्या टोळीत आणखी काही जणांचा सहभाग असल्याचे तपासांत निष्पन्न झाले होते. सुनील गुप्ता, महेश पाटील, (रा. विरार), अभिषेक शेलार (रा. वाडा, पालघर) व राहुल मुठाळ (रा. नाशिक) अशा चौघांची नावे पुढे आल्याने आडगाव पोलिसांनी गुप्ता, पाटील शेलार या तिघांना पालघर जिल्ह्यातील वाडा येथून व मुठाळला नाशिक शहरातून अटक केली आहे. पोलीस निरीक्षक इरफान शेख, पोलीस हवालदार सुरेश नरवडे, दशरथ पागी, विजय सूर्यवंशी, आदींसह पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे.

रेमडेसिविर इंजेक्शन विक्री प्रकरणी आडगाव पोलिसांनी आता एकूण आठ संशयित आरोपींना अटक केली असून, त्यात तीन महिला नर्सचा समावेश आहे, तर पोलिसांनी संशयितांकडून एकूण २२ रेमडेसिविर इंजेक्शन जप्त केले आहे. सोमवारी पोलिसांनी सर्व संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.