नाशिक : उघड्या घराच्या दरवाजातून प्रवेश करून चोरट्यांनी चाळीस हजार रुपयांच्या वस्तू चोरून नेल्याची घटना पंचवटीतील इंद्रकुंड परिसरात घडली आहे़ रवि उदय सोसायटीत राहणारे कल्पक श्यामसुंदर भागडिया यांनी शनिवारी (दि़१०) सकाळच्या सुमारास हॉलमध्ये लॅपटॉप व मोबाइल चार्जिंगला लावलेला होता़ सकाळी अवघ्या दहा मिनिटांत त्यांच्या घराच्या उघड्या दरवाजातून चोरट्यांनी लॅपटॉप व दोन मोबाइल फोन असा एकूण ४० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ याप्रकरणी भागडिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
पंचवटीत चाळीस हजारांची चोरी
By admin | Updated: October 11, 2015 21:40 IST