शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक नगरसेवकास चाळीस लाखांचा विकास निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:26 IST

महापालिकेच्या सत्ताकाळात मुळातच नगरसेवक निधी वापरला गेलेला नाही. मात्र, यंदा नगरसेवकांना त्यांचा स्वेच्छाधिकार निधी वापरण्यासाठी विशेष तरतूद करून आयुक्तांनी ...

महापालिकेच्या सत्ताकाळात मुळातच नगरसेवक निधी वापरला गेलेला नाही. मात्र, यंदा नगरसेवकांना त्यांचा स्वेच्छाधिकार निधी वापरण्यासाठी विशेष तरतूद करून आयुक्तांनी खुशखबर दिली आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकातून बांधील खर्च वजा जाता नगरसेवक स्वेच्छाधिकार निधीसाठी दोन टक्के तरतूद करण्यात आली आहे. ही रक्कम १३ कोटी ३४ लाख रुपये असून, प्रत्येक नगरसेवकाला १० लाख ५० हजार रुपयांचा स्वेच्छाधिकार निधी मिळणार आहे, तर याच अंदाजपत्रकात प्रभाग विकास निधीअंतर्गत ३८ कोटी १० लाख म्हणजेच प्रत्येक नगरसेवकासाठी ३० लाख रुपये, अशी तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील पाच लाख रुपयांपर्यंतची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांना प्रभाग समितीस्तरावरच मान्यता देण्यात येणार आहे.

दरम्यान, नगरसेवकांनी सुचवलेल्या कामांपैकी गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या महासभेत काही कामे एका अशासकीय ठरावांच्या आधारे घुसविण्यात आली होती. यातील बहुतांशी कामे रस्त्याची होती. त्यामुळे त्यासाठी आयुक्तांनी कर्ज काढण्यास नकार दिला होता. त्यामुळे भाजपाने मायको सर्कल आणि त्रिमूर्ती चौक येथे उड्डाणपुलासाठी निविदा काढल्या असतानादेखील त्यास स्थगिती देण्याचे पत्र महापौरांनी दिले. त्यानंतर आयुक्तांनी महापौरांना प्रशासकीय अधिकार नसल्याचे सांगितले. त्यामुळे जानेवारी महिन्यातील महासभेत घुसखोरी करून पुलांच्या कामांना स्थगिती देण्याचा ठराव तयार केला. मात्र, त्यानंतर आयुक्तांनी पुलांसाठी कार्यवाही सुरूच ठेवली. बुधवारी (दि.१७) स्थायी समितीची बैठक होणार असल्याचे लक्षात आल्यानंतर मात्र भाजपाने भूमिका बदलली. भाजपा गटनेता जगदीश पाटील यांनी मात्र आयुक्तांनी दिलेल्या शब्दानुसार सर्व नगरसेवकांच्या प्रभागात १६५ कोटी रुपयांची कामे धरण्यात येतील, असे स्पष्ट केले होते. प्रत्यक्षात मात्र अशी कोणतीच नॉन बजेटेड कामे घेतली नसल्याचे आयुक्तांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

इन्फो...

उड्डाणपुलांसाठी तरतूद

मायको सर्कल आणि त्रिमूर्ती चौक येथे उड्डाणपुलासाठी २४५ कोटी रुपयांचा खर्च येणार असला तरी हे दोन्ही पूल तीन वर्षांत पूर्ण करायचे असल्याने त्यासाठी तरतूद करण्यात आली आहे; परंतु नगरसेवकांची जी नियमित कामे असतात, त्यासाठी कर्ज काढण्याची गरज नाही.

-कैलास जाधव आयुक्त, महापालिका