शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

ब्राझीलचा गड आला; पण सिंह गेला

By admin | Updated: July 6, 2014 00:51 IST

ब्राझीलचा गड आला; पण सिंह गेला

आनंद खरे(जर्मनच्या ह्युमल्सचा हेडर आणि डेव्हिड लुईसचा हेडरने जर्मनी आणि ब्राझीलची नैय्या पार केली. मात्र या दोघांमध्ये होणाऱ्या उपांत्य सामन्यात जखमी झाल्यामुळे ब्राझीलचा हा पोस्टर बॉय दिसणार नाही.)२० व्या विश्वचषकाच्या चार उपउपांत्य सामन्यातील दोन सामने काल पार पडले. यातील पहिल्या आॅल युरोपच्या साम्यात जर्मनीने फ्रान्सला पराभूत करून रेकॉर्डसह १३ वेळा उपांत्य फेरीत दाखल होण्याची कामगिरी केली. तर यानंतर ब्राझील-कोलंबिया या दोन दक्षिण अमेरिकेच्याच संघातील सामन्यात अपेक्षेप्रमाणे ब्राझीलने बाजी मारली आणि आपल्या ६ व्या विश्वचषक विजेतेपदाकडे आणखी एक आश्वासक पाऊल टाकले.जर्मनीची सातत्यपूर्ण कामगिरी : जर्मनी आणि फ्रान्स या दोन युरोपीय माजी विश्वविजेत्यामध्ये झालेल्या या उपउपांत्य सामन्यात बहुतेक वेळा जर्मनीचेच वर्चस्व होते. जर्मनीने आघाडी, मध्यपंक्ती आणि बचाव या तीनही विभागात फ्रान्सपेक्षा सरस कामगिरी केली. फ्रान्सचा या सामन्याआधीच्या सामन्यातील खेळ बघता या स्पर्धेत जशी धडाकेबाज सुरुवात फ्रान्सकडून झाली तशी सामन्यागणिक त्याची धार कमी कमी होत गेली. कारण साखळी सामन्यात स्वित्झर्लंडवर ५ गोल त्यानंतर हुंडारूसवर ३ गोल करणाऱ्या फ्रान्सला त्यानंतर इक्वाडोर विरुद्ध एकही गोल करता आला नाही, तर उपउपांत्यपूर्व सामन्यात नायजेरियाने दोन गोलसाठी त्यांना सव्वा तास थोपवून धरले होते. कालच्या महत्त्वाच्या सामन्यातही काही अपवाद वगळता त्यांना जर्मनीवर फारसा दबाव टाकता आला नाही. एकतर सामन्यांच्या १२ व्या मिनिटालाच जर्मनीने आघाडी मिळविल्यामुळे शेवटची काही मिनिटे सोडल्यास फ्रान्सचा खेळ फारसा जोशपूर्ण नव्हता. जर्मनीचा खेळही फ्रान्सच्या तुलनेत फारच उजवा होता, असे नाही. मात्र फ्रान्सच्या तुलनेत ते तांत्रिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्याही सक्षम वाटत होते. जर्मनचे प्रशिक्षक जोकीम लुई यांनी या स्पर्धेत प्रथमच मिलोस्लाव क्लोसला सुरुवातीपासून मैदानात उतरवले. अर्थात क्लोसचा वैयक्तिक खेळ या सामन्यात काही करामत दाखवू शकला नाही. परंतु त्यांच्या मैदानात असण्याने जर्मनच्या इतर खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावला आणि त्यांची दखल घेण्यासाठी फ्रान्सला आपल्या दोन बजावपटूंना त्याच्या मागे ठेवावे लागले. त्यामुळे थॉमस मुल्लर आणि मेसुट ओझल यांना थोडी मोकळीक मिळाली. या दोघांनीही उजव्या आणि डाव्या बाजूने सतत आक्रमणे केल्यामुळे फ्रान्सच्या खेळाडूंना त्यांनी बचावात गुंतवून ठेवले. त्यामुळे फ्रान्सच्या आक्रमणाचे प्रमाण साहजिकच कमी झाले. तरी फ्रान्सच्या करीम बेंझीमाला पूर्वार्धात दोन आणि उत्तरार्धातही शेवटी शेवटी दोन चांगल्या संधी मिळाल्या होत्या. मात्र जर्मनचा गोली मॅन्यूएल नेयुरे याने त्याचे थेट फटके चांगल्या प्रकारे अडवल्यामुळे फ्रान्सला एका गोलची आघाडीही कमी करता आली नाही. जर्मनीच्या बास्तोन स्वानस्टायगर याने मध्यपंक्तीत खेळताना आघाडीशी चांगला समन्वय साधल्यामुळे जर्मनीला फ्रान्सवर दबाव राखण्यात यश आले आणि शेवटी त्यांनी १२ व्या मिनिटाला मिळालेली फ्री किक आणि त्यावर मॅट्स ह्युमेल्सने केलेला हेडरचा गोलच जर्मनीला १३ व्या वेळेस उपांत्य फेरीत दाखल होण्यास पुरेसा ठरला. ब्राझीलचा गड सर; मात्र सिंह गमावला : ब्राझील-कोलंबिया या दोन दक्षिण अमेरिकन संघामध्ये झालेल्या दुसऱ्या उपउपांत्य सामन्यामध्ये पुन्हा एकदा ब्राझीलची सरशी झाली. इतिहासावर नजर टाकल्यास ब्राझील कायमच कोलंबियावर मात करण्यात यशस्वी झालेला आहे. मात्र या विश्वचषकामध्ये कोलंबियाची कामगिरी बघता उपउपांत्य फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या कोलंबियाकडून अपेक्षा वाढल्या होत्या, तर ब्राझीलचा या विश्वचषकातील प्रवास नेटाने सुरू असला तरी एकंदरीत ब्राझीलच्या नावलौकिकाला साजेसा त्यांचा खेळ या विश्वचषकामध्ये बघायला मिळत नाही. कारण त्यांना गटातच मेक्सिको आणि उपउपांत्यपूर्व फेरीत चिलीने ज्याप्रकारे जेरीस आणले त्यावरून ब्राझीलला कोलंबिया पराभूत करणे तितकेसे सोपे जाणार नाही याची ब्राझीलसह सर्वांनाच कल्पना होती. मात्र या सामन्यात ब्राझील संघ इतर सामन्यांच्या तुलनेत चांगले प्रदर्शन केले. सामन्यात ब्राझीलचा नेयमार आणि कोलंबियाचा जेम्स रॉड्रिगेस या दोन्हीही १० नंबरची जर्सी घालणाऱ्या दोघांमधीलच लढाई जास्त मानली जात होती. मायकॉनला या सामन्यात संधी मिळाली त्याने डेव्हिड लुईस, कर्णधार थिएगो सिल्व्हा यांना बचावात मदत करतानाच काही वेळा आक्रमणामध्ये जात काही चांगल्या चालींना साथ दिली. नेयमारबरोबर ब्राझीलची आघाडी सांभाळणारे फ्रेड आणि हल्क यांचे दोन तीन चांगले प्रयत्न कोलंबियाचा गोली डेव्हिड ओस्पाना याने चांगल्याप्रकारे थोपवत ब्राझीलच्या या आघाडीपटूंना दाद दिली नाही, परंतु ब्राझीलच्या बचावपटूंनी मात्र डेव्हिड ओस्पानाला दोनवेळा चकवण्यात यश मिळविले. सामन्याच्या सुरुवातीलाच ७ व्या मिनिटाला नेयमारने मारलेल्या कॉर्नर किकचा अचूक अंदाज घेत ब्राझीलचा कर्णधार थिएगो सिल्व्हाने मागून धावत येत गोलपोस्टच्या उजव्या कोपऱ्यापर्यंत आलेल्या चेंडूला गोलमध्ये ढकलण्यात यश मिळवले आणि आघाडी घेतली. आणि आक्रमण हाच योग्य बचाव, हे तंत्र अवलंबून चेंडू कोलंबियाच्याच भागात राहील याची काळजी घेत आघाडी टिकवली, तर उत्तरार्धातही हेच धोरण कायम राखत खेळ सुरू ठेवला. परिणामी ६७ व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री किकचा लाभ घेण्याची करामत यावेळी ब्राझीलचा दुसरा बचावपटू डेव्हिड लुईस याने केली. नेहमी फ्री किक घेणाऱ्या नेयमारने यावेळी लुईसला संधी दिली आणि ही मिळालेली संधी कारणी लावत लुईसने चेंडूला योग्य दिशा देत कोलंबियाच्या खेळाडूंनी तयार केलेल्या भिंतीच्या बाजूने चेंडू तटवून गोलचा उजवा कोपरा मिळवत ब्राझीलचा या सामन्यातील दुसरा आणि आपला या स्पर्धेतील दुसरा गोल झळकवला. या गोलमुळे दुप्पट झालेल्या ब्राझीलच्या आघाडीमुळे कोलंबियाला आता आॅल आउट खेळण्याशिवाय पर्याय नव्हता, त्यामुळे जेम्स रॉड्रिगेझ, जुआन गुलेर्मो, व्हिक्टर अबार्बो यांनी ब्राझीलच्या गोलपोस्टकडे वारंवार हल्ले सुरू केले. त्यांच्या या प्रयत्नांना यशही आले आणि त्यांना पेनल्टी मिळाली. या पेनल्टीवर जेम्स रॉड्रिगेझने ज्युलियन सेझारला लीलया चकवत सहज गोल करीत आघाडी कमी केली. मात्र ब्राझीलने जास्त पडझड होऊ न देता एक गोलच्या आघाडीसह सामना संपवण्यावर भर देत बचावात सुसूत्रता राखत उपांत्य फेरीतील आपली जागा पक्की केली. ब्राझीलला हे यश मिळाले असले तरी शेवटची काही मिनिटे बाकी असताना (८८ व्या मिनिटाला) पाठमोरा असणाऱ्या नेयमारच्या पाठीवर उडी घेत कोलंबियाच्या ज्यून कॅमेलो झेडेगाने त्याला गुडघा मारून जखमी केले. हा प्रहार नेयमारला तर लागलाच, परंतु ब्राझीलच्या आणि तमाम फुटबॉलप्रेमींच्याच जिव्हारीही लागला. कारण या प्रहारामुळे नेयमारला निदान ४-६ आठवडे खेळता येणार नसल्यामुळे तमाम फुटबॉलप्रेमींना ब्राझीलच्या या पोस्टरबॉयला निदान या विश्वचषकामध्ये बघायची संधी मिळणार नाही. कोलंबिया या स्पर्धेतून बाहेर पडला असला तरी त्यांच्या जेम्स रॉड्रिगेझने पेनल्टीवर गोल करीत आपली गोलची संख्या ६ वर नेत गोल्डन बुटाच्या शर्यतीत आघाडी घेतलेली आहे. त्याची आघाडी आता वाढणार नाही. या शर्यतीत नेयमार आता नसणार आहे तर थॉमस मुल्लर आणि लिओनेल मेस्सी यांनाच केवळ आता संधी उरली आहे.