नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेले माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना उद्या (दि.२६) रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. माजी आदिवासी विकासमंत्री व उच्च शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून, काल (दि.२५) सायंकाळपर्यंत ते रुग्णालयात चालू-फिरू लागल्याने त्यांची प्रकृती चांगली असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. डॉ. गावित यांना पक्षघाताचा झटका आल्याने सोेमवारी रात्री नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असून, मेंदूच्या एमआरआय चाचणीत त्यांच्या मेंदूत रक्ताची छोटी गाठ असल्याचे आढळून आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने गुरुवारी सायंकाळीच त्यांना सोडण्यात येणार होते. मात्र, आता त्यांना शुक्रवारी (दि.२६) सकाळी रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.(प्रतिनिधी)
माजी मंत्री गावितांना उद्या रुग्णालयातून सोडणार
By admin | Updated: June 26, 2015 01:28 IST