शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्री खडसेंची लाचलुचपतकडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 23:57 IST

माहिती देण्यास नकार : प्रसिद्धिमाध्यमांवर राग नाशिक : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पुण्यातील भोसरी येथील जमीनप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नव्याने केलेल्या आरोपांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सुरू केली असून, यासंदर्भात खडसे यांनी बुधवारी दुपारी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कार्यालयात हजेरी लावली. सुमारे दोन तास खडसे यांची चौकशी करण्यात आली असली तरी, लाचलुचपतच्या अधिकाºयांनी कानावर हात ठेवल्याने यासंदर्भातील गूढ वाढले आहे.

माहिती देण्यास नकार : प्रसिद्धिमाध्यमांवर रागनाशिक : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पुण्यातील भोसरी येथील जमीनप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नव्याने केलेल्या आरोपांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सुरू केली असून, यासंदर्भात खडसे यांनी बुधवारी दुपारी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कार्यालयात हजेरी लावली. सुमारे दोन तास खडसे यांची चौकशी करण्यात आली असली तरी, लाचलुचपतच्या अधिकाºयांनी कानावर हात ठेवल्याने यासंदर्भातील गूढ वाढले आहे.दरम्यान, चौकशी आटोपून परतणाºया खडसे यांना प्रसिद्धिमाध्यमांनी माहिती विचारण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी बोलण्यास नकार दिला. मात्र, ‘छापा, छापा मोठा फोटो छापा’ असे पत्रकारांना उद्देशून आपली उद्गिनता व्यक्त केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने चौकशीत बरेच उलटसुलट प्रश्न खडसेंना विचारले असावेत, असा अर्थ काढला जात आहे.माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे भोसरी येथील एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरण सध्या गाजत असून, प्रारंभी या जमिनी खरेदीची आपणास काहीच माहिती नसल्याचे सांगणाºया खडसे यांनी चौकशी आयोगासमोर त्याची कबुली दिली. परंतु जमीन व्यवहाराचे पैसे आपण दिले नसल्याचा पवित्रा घेतला होता. त्यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अलीकडेच प्रसिद्धीमाध्यमांसमोर खडसेंच्या बॅँक व्यवहारांची माहिती जाहीर करून याबाबत न्यायालयातही तक्रार केली होती. न्यायालयाने खडसेंविरुद्ध चौकशी करणाºया लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर ताशेरेही ओढले होते. या सर्व पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी दोन वाजता खडसे यांनी पोलीस बंदोबस्तात नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कार्यालयात हजेरी लावली. सुमारे दोन ते अडीच तास खडसे या कार्यालयात हजर होते. यावेळी मात्र पत्रकार तसेच अभ्यागतांना कार्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. चार वाजेनंतर खडसे चौकशी आटोपून निघून गेले. परंतु त्यांची नेमकी कोणत्या विषयावर चौकशी करण्यात आली याचा उलगडा होऊ शकला नाही.लाचलुचपतचे सोयीस्कर मौनएरव्ही दोनशे रुपये लाच घेणाºयाला पकडल्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांना प्रेस नोट पाठवून आपली पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानणाºया लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याबाबत मात्र सोयीस्कर मौन पाळले. प्रसिद्धीमाध्यमांनी विचारणा केल्यावर ‘नो कॉमेंट्स’ एवढेच उत्तर देण्यात आले. त्यामुळे लाचलुचपत खाते कोणाच्या तरी दबावाखाली काम करीत असल्याची चर्चा होऊ लागली आहे.खडसेंची उद्विग्नताएकनाथ खडसे दुपारी २ वाजता पोलिसांच्या ताफ्यातच एसीबीच्या कार्यालयात हजर झाले. खडसे स्वत:हून हजर झाल्याचे वृत्त पसरताच, त्यांच्या समर्थकांनीही कार्यालयाच्या बाहेर गर्दी केली होती. चौकशी आटोपून खडसे निघाल्यावर प्रसिद्धिमाध्यमांनी त्यांना माहिती विचारण्याचा प्रयत्न केला तर काहींनी त्यांची छबी टिपली. त्यावर त्रासून खडसे यांनी प्रसिद्धिमाध्यमांवरच राग काढत ‘छापा, छापा, माझा मोठा फोटो छापा’ असे सांगून त्यांनी त्रागा केला.