नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकास आराखड्यातील प्रत्येक विकासकामांची तपासणी होऊन लेखापरीक्षण करण्यात यावे आणि त्यावर झालेला खर्च जाहीर करावा, अशी मागणी माजी महापौर दशरथ पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. पाटील यांनी म्हटले आहे, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेसह अन्य २१ विभागांनी विकास आराखड्यानुसार केलेल्या प्रत्येक विकासकामांची तपासणी करण्यात यावी. त्यांची यादी नावासह व त्यावर झालेल्या खर्चाचीही माहिती देण्यात यावी. शासनाकडून निधी मिळवूनही कामे झालेले नसतील अशा विभागांवर महापालिकेसह कारवाई करण्याची मागणीही पाटील यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
माजी महापौरांनी मागितला सिंहस्थ कामांचा हिशेब
By admin | Updated: May 6, 2016 00:26 IST