शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगरसेवक गांगुर्डे यांचा संशयास्पद मृत्यू

By admin | Updated: September 18, 2016 01:18 IST

हत्त्या की आत्महत्त्या? : पेठ रोडवरील इंद्रप्रस्थनगरी परिसरात आढळला मृतदेह

 पंचवटी : शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा पंचवटीतील भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान नगरसेवक ज्योती गांगुर्डे यांचे पती अर्जुन किसन गांगुर्डे (५२) यांचा मृतदेह शनिवारी (दि़ १७) सकाळी १० वाजेच्या सुमारास पेठ रोडवरील इंद्रप्रस्थनगरीच्या समोरील मेघराज बेकरीच्या मागील मोकळ्या भूखंडावर त्यांच्याच वॅगनर कारमध्ये संशयास्पदरीत्या आढळून आला़ या कारमध्ये पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली असून, त्यामध्ये काही ठेकेदारांची नावे असल्याचे वृत्त आहे़ दरम्यान, गांगुर्डे यांच्या शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून, याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ म्हसरूळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पेठ रोडवरील इंद्रप्रस्थनगरी परिसरातील मोकळ्या भूखंडावर एक वॅगनर कार (एमएच १५, सीटी ०९४१) उभी असल्याचे नागरिकांनी बघितले़ गत दोन दिवसांपासून परिसरात फिरणाऱ्या या कारबाबत संशय आल्याने एका इसमाने कारजवळ जाऊन बघितले असता कारचालकाच्या शेजारच्या सीटवर एक इसम झोपलेल्या अवस्थेत आढळून आला़ त्याने ही माहिती तत्काळ म्हसरूळ पोलीस ठाण्यास कळविली़ पेठरोड परिसरात एका कारमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त डॉ़ राजू भुजबळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली़ पोलिसांनी वॅगनर कारमधील कागदपत्रांची तपासणी केली असता त्यामध्ये नगरसेवकाचे लेटरपॅड तसेच पक्षाची कागदपत्रे आढळून आली़ या कागदपत्रांवरून हा मृतदेह माजी नगरसेवक अर्जुन गांगुर्डे यांचा असल्याचे समोर आले़ पंचवटीमध्ये ही वार्ता पसरताच आमदार बाळासाहेब सानप हे पदाधिकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते़ म्हसरूळ पोलिसांनी मृतदेह व कारच्या केलेल्या तपासणीत पाण्याच्या बाटल्या वगळता कोणत्याही प्रकारच्या संशयास्पद वस्तू मिळाल्या नसल्याने गांगुर्डे यांनी आत्महत्त्या केली की त्यांची हत्त्या करण्यात आली, असा पेच निर्माण झाला आहे़ जिल्हा रुग्णालयात गांगुर्डे यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, त्यांचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे़ मयत गांगुर्डे याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. मयत अर्जुन गांगुर्डेअर्जुन गांगुर्डे यांचा मृतदेह ज्या कारमध्ये आढळला त्यामध्येच पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली आहे़ पोलिसांनी जप्त केलेली ही चिठ्ठी गांगुर्डे यांनी पत्नी ज्योती यांना लिहिलेली असून, त्यामध्ये सिंहस्थ कुंभमेळा कामात अडथळा आणला, असा उल्लेख असून, त्यामध्ये तीन-चार ठेकेदारांची नावे असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे़ (वार्ताहर)माजी नगरसेवक अर्जुन गांगुर्डे यांचा मृतदेह त्यांच्याच वॅगनर कारमध्ये सकाळच्या सुमारास आढळून आला़ या कारमध्ये एक चिठ्ठी मिळाली असून, ती तपासासाठी ताब्यात घेतली आहे़ गांगुर्डे यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असले तरी प्रथमदर्शनी हा मृत्यू संशयास्पद असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे़- लक्ष्मीकांत पाटील, पोलीस उपायुक्त, नाशिक