शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगरसेवक बाळासाहेब तिगोटे यांचे निधन

By admin | Updated: July 28, 2016 01:23 IST

माजी नगरसेवक बाळासाहेब तिगोटे यांचे निधन

 नाशिक : नाशिक महापालिकेच्या पहिल्या पंचवार्षिक कारकिर्दीतील नगरसेवक, पॅँथर चळवळीचे नेते बाळासाहेब तिगोटे (५७) यांचे पुणे येथे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, बहीण असा परिवार आहे. गेल्या महिनाभरापासून तिगोटे हे हृदय आणि अन्ननलिकेच्या विकाराने त्रस्त होते. त्यांच्यावर नाशिकमधील साईबाबा आणि सुविचार हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना पुणे येथील खासगी रूग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच बुधवारी (दि. २७) दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. पॅँथर चळवळीचे धडाडीचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून तिगोटे यांची ओळख आहे. दलितांच्या प्रश्नावर उभारण्यात आलेल्या अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. नाशिकमध्ये बौद्धांच्या प्रश्नांवर झालेल्या आंदोलनासाठी त्यांना कारागृहात जावे लागले. पुणे येथे झालेल्या पॅँथरच्या आंदोलनातही त्यांचा उल्लेखनीय सहभाग होता. एकत्रित रिपाइंचे पहिले परंतु अपक्ष नगरसेवक म्हणून ते नाशिक महापालिकेत निवडून आले. पॅँथरनंतर त्यांनी मासमुव्हमेंट या संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांवर आंदोलने उभारली. तिगोटे यांनी प्रारंभी मधुकर चित्रपटगृहात काम केले. त्यानंतर त्यांनी इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये काही वर्ष नोकरी केली. परंतु सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी सरकारी नोकरी सोडून सामाजिक कार्यात स्वत:ला वाहून घेतले. विविध सामाजिक संघटनांवर त्यांनी काम केले आहे. शाहू बोर्डिंगचे ते विद्यमान अध्यक्ष होते. (प्रतिनिधी)