शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

माजी सभागृह नेत्याला डेंग्यू, सातपूरमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:28 IST

शहरात डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना केल्या जात असल्याचा दावा महापालिकेने केला असला तरी प्रसार सुरूच आहे. सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ८ मधील गुरुकुल कॉलनीत महापालिकेचे माजी सभागृह नेता डॉ. सुभाष देवरे यांना डेंग्यूची लागण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नाशिक : शहरात डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना केल्या जात असल्याचा दावा महापालिकेने केला असला तरी प्रसार सुरूच आहे. सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ८ मधील गुरुकुल कॉलनीत महापालिकेचे माजी सभागृह नेता डॉ. सुभाष देवरे यांना डेंग्यूची लागण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  शहरातील स्वच्छता मोहिमेचा यानिमित्ताने फज्जा उडाल्याचे दिसत आहे. आॅक्टोबर महिन्यातच तब्बल सव्वाशे डेंग्यूचे रुग्ण आढळले असून, ते सर्व पॉझिटिव्ह आहेत. अशा प्रकारचे रुग्ण आढळल्यानंतर महापालिका त्या-त्या परिसरात जाऊन स्वच्छता मोहीम राबवित असली तरी मुळातच नियमित स्वच्छता आणि विशेषत: डास प्रतिबंधक फवारणी होत नसल्याच्या तक्रारी असून, त्यालादेखील यानिमित्ताने पुष्टी मिळत आहे. सिडको प्रभागाचे सभापती सुदाम डेमसे यांच्या कन्येला डेंग्यू झाल्यानंतर आता सातपूर विभागात वनविहार कॉलनीच्या जवळील गुरुकुल कॉलनी परिसरात राहणाºया डॉ. देवरे यांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या सहा दिवसांपासून ते एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. परिसरात महापालिकेने तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी तसेच पाण्याचे साठे तपासावे, बांधकामावरील पाण्याबाबत नोटिसा द्याव्या, अशी मागणी होत आहे.