शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी तालुक्यातील राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:11 IST

घोटी (पुरुषोत्तम राठोड) : इगतपुरी तालुक्यात आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षांच्या वतीने ...

घोटी (पुरुषोत्तम राठोड) : इगतपुरी तालुक्यात आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षांच्या वतीने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यात पाच गट, दहा गण असून, या गटांवर तीन शिवसेना, एक काँग्रेस, एक राष्ट्रवादीची सत्ता आहे. आरक्षण बदलामुळे गट बदलण्याची चिन्हे समोर असताना दुसऱ्या गटातून लढाईच्या तयारीला लागणारे उमेदवार सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ओबीसींच्या निर्णयामुळे पुन्हा बॅकफूटवर आल्याचे दिसत आहे. अर्थात पुन्हा आपला गट काबीज करण्याच्या प्रयत्नात आहेत.

कोरोना महामारीमुळे दोन वर्षांच्या काळात विकास कामे रखडली असल्याने आणि येत्या काळात निवडणुकांचे पडघम वाजणार असल्याने सर्वच पक्षांतील लोकप्रतिनिधींच्या उद्‌घाटनाचे पेव फुटले आहे. काही लोकप्रतिनिधींना एवढी घाई झाली की, आदिवासी वाड्या-पाड्यांवर वापरावयाचा डोंगरी निधी अतिघाईने की मर्जी राखण्यासाठी वर्ग करण्यात आला. विकासाच्या मुद्यावर कार्य करीत असताना एका गावात वर्ग झालेला निधी, कामाची सुरुवात झाली असताना काही राजकीय हितापोटी त्या ठिकाणचा निधी एका गावातून दुसऱ्या गावात पळविला असल्याची तक्रार शिवसेनेच्या एका गटनेत्याने केली आहे. अशा विविध विषयांना तालुक्यात उधाण आले असून, शासकीय पातळीवर त्याची चौकशी सुरू झाली आहे. इगतपुरी तालुक्यातील महत्त्वाच्या घोटी गटावर सर्वांचे लक्ष वेधले असून, स्थानिक उमेदवारांच्या विरोधात शह देण्यासाठी विरोधक मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. एकंदरीत सर्व पक्षांतील पदाधिकारी श्रेयाची लढाई लढण्यात व्यस्त असून, विकासाच्या मुद्यावर येऊ घातलेल्या निवडणुकीत उमेदवारांचा कस लागणार आहे.

------------

समस्यांना बगल

इगतपुरी आदिवासी तालुका असून, तालुक्यात सर्वांत जास्त अतिवृष्टीमुळे दरवर्षी रस्त्यांची वाताहत होते.

अतिदुर्गम भागातील रस्ते, गावातील शाळा, नळपाणी योजना, या मूलभूत सुविधांचे निवारण करण्यासाठी ९६ ग्रामपंचायतींचे कार्य पूर्णत्वास नेण्याचे कार्य स्थानिक प्रशासन तथा लोकप्रतिनिधींचे आहे. समस्यांचे निवारण करणे दूरच काही राजकीय मंडळींकडून हित तथा द्वेषाचे राजकारण सुरू झाले असल्याने तालुक्यातील जनतेच्या समस्यांना बगल दिली जात आहे.

--------------

राजकीय पदाधिकाऱ्यांची धडपड

निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष आक्रमक झाले असून, येऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने स्वतःला सिद्ध करण्यासाठी राजकीय नेते मंडळी रस्त्यावर उतरली आहेत. त्यात तालुक्यात सर्वांत जास्त गाजणारे मुद्दे समोर येत आहेत. घोटीतील काँग्रेस-सेनेतील पाणी प्रश्नाचा श्रेयवाद, राष्ट्रवादीचे ओबीसी आंदोलन, मनसेचा कामगारांच्या प्रश्नावरील लढा, याबरोबरच विकासकामांच्या उद्‌घाटनाचे पेव अशा या विविध मुद्यांवर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपड करीत आहेत.

(०७ घोटी १)

070721\07nsk_21_07072021_13.jpg

०७ घोटी १