मालेगाव : तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींच्या ६९ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होत असून, मंगळवारी (दि. १६) प्रारुप मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. दि. १६ ते २० जानेवारीदरम्यान मतदार यादीवर हरकती व सुनावणी घेण्यात येईल. २३ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.तालुक्यातील सातमाणे, मांजरे, दुंधे, काष्टी, निळगव्हाण, वडगाव, झोडगे, रोंझाणे, नाळे, हाताणे, लेंडाणे, वनपट, कौळाणे गा., दसाणे, देवघट, नांदगाव बु।।, साजवहाळ, लोणवाडे, पळासदरे, खाकुर्डी, वळवाडे, झाडी, वºहाणे, चिखलओहोळ, डाबली, गुगूळवाड, ज्वार्डी, पाथर्डी, निमगाव, राजमाने, करंजगव्हाण, निमशेवडी, नगाव दिगर, हिसवाळ या ३५ ग्रामपंचायतींच्या ६९ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीची येथील महसूल विभागाकडून तयारी सुरू झाली आहे. प्रारुप मतदार यादी हरकती, सुनावणी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. संबंधित गावांतील राजकारण तापणार हे नक्की.वधानसभा जानेवारी २०१८ची मतदार यादी ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. या वॉर्डनिहाय मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांना मतदान करता येणार आहे.
प्रारुप मतदार यादी आज जाहीर होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 23:59 IST
मालेगाव : तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींच्या ६९ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होत असून, मंगळवारी (दि. १६) प्रारुप मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. दि. १६ ते २० जानेवारीदरम्यान मतदार यादीवर हरकती व सुनावणी घेण्यात येईल. २३ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
प्रारुप मतदार यादी आज जाहीर होणार
ठळक मुद्देमालेगाव : ३५ ग्रा. पं. ची पोटनिवडणूक जानेवारी २०१८ची मतदार यादी ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी ग्राह्य