शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
4
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
5
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
6
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
7
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
8
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
9
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
10
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
11
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
12
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
13
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
14
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
15
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
16
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
17
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
18
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
19
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
20
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका

प्रारूप पूर्वीच प्रभाग रचना होणार स्पष्ट

By admin | Updated: October 6, 2016 00:46 IST

मनपा निवडणूक : आरक्षण सोडतीची प्रशासनाकडून तयारी; सीमा निश्चितीकडे लक्ष

नाशिक : फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार येत्या सोमवारी (दि.१०) प्रसिद्ध केली जाणार असली तरी शुक्रवारी (दि.७) होणाऱ्या आरक्षण सोडतीच्याच वेळी सीमांकनेही जाहीर केली जाणार असून, प्रभागाची रचना त्याचवेळी स्पष्ट होणार आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाने बुधवारी (दि.५) आयुक्तांच्या उपस्थितीत आरक्षण सोडतीची रंगीत तालीम पार पाडत सज्जता दाखवून दिली. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, प्रारूप प्रभाग रचना दि. १० आॅक्टोबरला प्रसिद्ध केली जाणार असून, त्यावर दि. १० ते २५ आॅक्टोबर या कालावधीत नागरिकांच्या हरकती व सूचना मागविल्या जाणार आहेत. तत्पूर्वी, शुक्रवारी (दि.७) अनुसूचित जाती, जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील महिला यासाठी राखीव जागांची सोडत काढण्यात येणार आहे. महाकवी कालिदास कलामंदिरात होणाऱ्या या सोडतीच्या वेळी सर्व ३१ प्रभागांचे नकाशे व त्यांच्या सीमाही सभागृहाबाहेर फलकावर प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रभागांची रचना त्याचवेळी ढोबळ स्वरूपात स्पष्ट होणार आहे. मात्र, प्रभागात नेमक्या कोणत्या नगरांचा, भागांचा समावेश असेल याची माहिती दिली जाणार नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. शुक्रवारी होणाऱ्या आरक्षण सोडतीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या उपस्थितीत रंगीत तालीम करण्यात आली. आरक्षण सोडतीच्या वेळी तीन स्क्रीन लावण्यात येणार असून, बाहेरही दोन स्क्रीनची व हजार खुर्च्यांची व्यवस्था केली जाणार आहे. आरक्षण सोडतीला हरकतप्रारूप प्रभाग रचनेपूर्वीच होणाऱ्या आरक्षण सोडतीला शिवसेनेसह कॉँग्रेस-राष्ट्रवादीने हरकत घेतली आहे. याबाबत शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे व कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर यांनी आयुक्तांची भेट घेऊन आरक्षणाच्या वेळी प्रभागांच्या सीमाही जाहीर करण्याची मागणी केली. प्रभागांची सीमांकने जाहीर झाल्याशिवाय कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण पडले याचा काहीही उलगडा होणार नसल्याचा दावा या नेत्यांनी केला. उपमहापौर गुरुमित बग्गा यांनीही मागील पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळी सीमांकने जाहीर केल्याचे स्मरण करून देत यंदाही त्याचीच पुनरावृत्ती करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. परंतु सदरचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने अगोदरच आखून दिला असल्याचे सांगत आयुक्तांनी त्याबाबत आयोगाकडेच दाद मागण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, शिवसेनेकडून आयोगाला याबाबत फॅक्स केला जाणार असल्याची माहिती महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली.