शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
4
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
5
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
6
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
8
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
9
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
11
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
12
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
13
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
15
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
16
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
17
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
18
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
19
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
20
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान

जिल्ह्यात ७०० गावांत वनसंवर्धन

By admin | Updated: March 21, 2017 00:45 IST

५५ टक्के वनक्षेत्र : लोकसहभागातून वनविकासावर भर; संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांमध्ये वाढ

अझहर शेख :  नाशिकगावपातळीवरील वनसंवर्धन व वनसंरक्षण स्थानिक गावकऱ्यांच्या सहभागाशिवाय अशक्य आहे. सदर बाब लक्षात घेऊन वन विभागाकडून वनविकासाबरोबरच जैवविविधता जोपासण्यासाठी नाशिक पूर्व व पश्चिम विभागातील एकूण १४ तालुक्यांमध्ये सुमारे सातशे संयुक्त वनव्यवस्थापन समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या समित्यांमार्फत लोकसहभागातून वन व वन्यजीव संवर्धन केले जात आहे. नाशिक जिल्ह्याला नैसर्गिक वरदान लाभलेले असून, शहरासह जिल्ह्यांमधील विविध तालुक्यांत वने व वन्यजीवांचे प्रमाण चांगले असून, त्यांच्या संवर्धनासाठी वन विभागाकडून लोकसहभाग वाढविला जात आहे. यासाठी पूर्व व पश्चिम विभागाच्या हद्दीमधील तालुक्यातील गावे, आदिवासी पाड्यांवरील रहिवाशांना विश्वासात घेऊन संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांची रचना करून त्या माध्यमातून त्या परिसरातील वनजमिनीवर वृक्षलागवड व संवर्धन तसेच वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी लोकसहभाग वाढविण्यावर वनविभाग भर देत आहेत. नाशिक पूर्व विभागात एकूण ३२० तर पश्चिम विभागाच्या हद्दीत एकूण ३९४ गावांमध्ये संयुक्त वनव्यवस्थापन समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या समित्यांच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांचा विश्वास संपादन करून वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी जंगल संरक्षणासह जंगलवाढीसाठी प्रयत्न करताना दिसून येत आहे. वन विभागाने जिल्ह्यातील विविध गावांमधील वनजमिनींवर २००५ सालानंतर करण्यात आलेले अतिक्रमण काढून त्या जागेवर रोपवन योजनेंतर्गत वनीकरण करून वृक्षसंवर्धनाचा उपक्रम हाती घेतला आहे. या समित्यांमार्फत लोकसहभागातून वन विकासाची विविध कामे गावपातळीवर केली जात आहे. वननिर्मितीसाठी वृक्षलागवड व संवर्धन, डोंगरउतारावरून वाहणारे पावसाचे पाणी अडविणे, समपातळीवर चर खोदणे यांसारख्या उपाययोजना करत वनवाढीसाठी पूरक ठरणारे मृदा व जलसंधारणाची कामे केली जात आहे.