शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘संतोषा-भागडी’ची वनसंपदा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:11 IST

त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बेळगाव ढगा परिसरात संतोषा, भागडी हे दोन डोंगर असून, या डोंगरांच्या पाठीमागील बाजूने सारूळ शिवारात गौन ...

त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बेळगाव ढगा परिसरात संतोषा, भागडी हे दोन डोंगर असून, या डोंगरांच्या पाठीमागील बाजूने सारूळ शिवारात गौन खनिजांच्या उत्खननासाठी विकासकांकडून सातत्याने स्फोट घडविले जात आहेत. दरम्यान, याप्रकरणी वनप्रेमी, निसर्गप्रेमींनी तीव्र विरोध दर्शवीत एल्गार पुकारल्यानंतर वन, महसूल विभागाला खडबडून जाग आली. क्षेत्र गट निश्चिती समितीची जबाबदारी नाशिक पश्चिम वन विभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांकडून सोपविण्यात आली आहे. दरम्यान, गर्ग यांनी सहायक वनसंरक्षक गणेश झोळे, वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांच्यासह संतोषा, भागडी डोंगरांना भेटी दिल्या, तसेच सारूळ शिवारातील उत्खननाचीही माहिती जाणून घेतली. यामध्ये संतोषा व भागडी डोंगरमाथ्यावरील नऊ विकसकांनी वन हद्दीपासून सुमारे १५ मीटर अंतरावर, तर तिघा विकासकांनी तर वन हद्द ओलांडून १ मीटर आतपर्यंत वनजमिनीत घुसखोरी केल्याचे सर्वेक्षणात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी सूरज मांढरे आता या उत्खनन प्रकरणाबाबत काय कारवाई करणार, याकडे आता जिल्हावासीयांसह पर्यावरणप्रेमी संघटनांचे लक्ष लागले आहे.

---इन्फो---

डझनभर विकासकांना वनखात्याचा ‘रेड अलर्ट’ वनहद्दीपासून पंधरा मीटर अंतरापर्यंत उत्खनन करणाऱ्या नऊ आणि वनहद्दीत शिरकाव केलेल्या तीन अशा डझनभर विकासकांना वनखात्याने नोटिसा बजावून ‘रेड अलर्ट’ दिला आहे. भारतीय वन कायदा १९२७ मधील कलम- ६३ (ब) नुसार या नोटिसा बजावण्यात आल्याचे पंकज गर्ग यांनी सांगितले. सध्या ज्या जागेत विकासकांकडून ब्लास्टिंग करत उत्खनन सुरू आहे, ती जागा महसूल क्षेत्राच्या ताब्यातील असल्याने सर्वेक्षण अहवालातून याबाबत कारवाईची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे पश्चिम वन विभागाने केली आहे.