शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

वन अधिकाऱ्याला वाळूचोरांची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:36 IST

नांदूरमधमेश्वर अभयारण्याचा परिसर असलेल्या खानगाव थडी येथे अवैधरीत्या वाळू उपसा करणाºयांनी वन अधिकारी भगवान ढाकरे यांना अरेरावीची भाषा करून धमकी दिली. ढाकरे यांनी संबंधित वाळूतस्करांविरोधात सायखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, याप्रकरणी सायखेडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सायखेडा : नांदूरमधमेश्वर अभयारण्याचा परिसर असलेल्या खानगाव थडी येथे अवैधरीत्या वाळू उपसा करणाºयांनी वन अधिकारी भगवान ढाकरे यांना अरेरावीची भाषा करून धमकी दिली. ढाकरे यांनी संबंधित वाळूतस्करांविरोधात सायखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, याप्रकरणी सायखेडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  बुधवारी (दि. २०) रात्री दीड वाजता वन अधिकारी भगवान ढाकरे, वनपाल पंडित आगळे, वनरक्षक चंद्रमनी तांबे, वनकर्मचारी प्रकाश गांगुर्डे, वाहनचालक रामदास कडाळे, वनकर्मचारी सुनील जाधव हे खानगाव थडी परिसरात गस्त घालत असताना गोदावरी नदीपात्रात वनखात्याच्या हद्दीतून काही लोक ट्रॅक्टरने वाळूची चोरटी वाहतूक करीत असल्याची खबर मिळाली. नांदूरमधमेश्वरच्या बाजूने जाऊन माहितीची शहानिशा केली असता खानगाव थडीच्या बाजूने एका ट्रॅक्टरमध्ये वाळू भरीत असल्याचे दिसून आले. वाळूतस्करांना वन कर्मचारी येत असल्याची चाहूल लागल्याने त्यांनी वाळू भरलेला ट्रॅक्टर नदीपात्रातून वरती आणून एका वस्तीजवळ आडोशाला उभा केलेला दिसला. याबाबत चौकशी करीत असताना भारत जगताप, रा. खानगाव थडी (ता. निफाड) व दीपक निकम, रा. दिंडोरी तास हे लाल रंगाच्या हिरोहोंडा दुचाकीवरून आमच्या जवळ आले.शासकीय कामात अडथळा निर्माण करून दुचाकी तेथेच सोडून वाळूने भरलेला ट्रॅक्टर घेऊन पळ काढला, तर दीपक निकम हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला, असे ढाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सदर मोटारसायकल पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली असून, पोलीस अधिक तापस करत आहेत.अरेरावी सुरू केलीभारत जगताप यास सदर निळ्या रंगाचा ट्रॅक्टर कोणाचा आहे असे विचारले असता तो माझ्या मालकीचा आहे, असे त्याने उत्तर दिले. ट्रॅक्टर खानगाव थडी येथील वन खात्याच्या कार्यालयात घेऊन या असे सांगितले असता त्यांनी अरेरावी केली. तुमचा काय संबंध आहे, तुम्ही मला का त्रास देतात. तुम्हाला बघून घेईल असे बोलून, मी तुम्हाला सोडणार नाही, तुम्ही येथे कसे नोकरी करता अशी धमकी दिली.

टॅग्स :forest departmentवनविभाग