शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

उपसचिवांकडून वन खात्याची झाडाझडती

By admin | Updated: January 18, 2017 00:56 IST

वन हक्क आढावा : मार्चअखेर दावे निकाली

नाशिक : वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी बोलविलेल्या बैठकांना गैरहजर राहण्याबरोबरच, फायलींवर स्वाक्षरी करण्यास टाळाटाळ करण्याच्या होत असलेल्या तक्रारीचा आधार घेत राज्यपालांचे उपसचिव परिमल सिंह यांनी मंगळवारी वन खात्याच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरून झाडाझडती घेतली.  जिल्हाधिकारी कार्यालयात वन कायद्याच्या अंमलबजावणीच्या प्रगती आढाव्याची बैठक परिमल सिंह यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी जिल्ह्णातील परिस्थिती त्यांनी जाणून घेतली. गेल्या सहा महिन्यांत वन हक्क कायद्यांतर्गत दाखल असलेल्या दाव्यांच्या निकाली काढण्याचे प्रमाण व प्रत्यक्ष आदिवासींना जागा वाटप करण्याबाबत सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. वन खात्याकडून या संदर्भात केली जात असलेली टाळाटाळ परिमल सिंह यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्याने त्यांनी त्याबाबत जाब विचारला. वन हक्कच्या महिन्याकाठी बोलविण्यात येत असलेल्या बैठकांना अधिकारी गैरहजर राहत असल्याने तसेच दाव्यांवर स्वाक्षरी करण्यासाठी बराच कालावधी लोटत असल्याचेही यावेळी लक्षात येताच परिमलसिंह यांनी जाब विचारला. तसेच राज्यपालांनी वर्षभरापूर्वी काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासही वन खाते उदासीन असल्याचे या बैठकीत निदर्शनास आले.  नाशिक जिल्ह्णात वन हक्क दाव्यांबाबत सुरू असलेल्या प्रगतीबाबत परिमल सिंह यांनी समाधान व्यक्त केले तसेच जे दावे अजून कागदपत्रांअभावी अपूर्ण आहेत त्याची पूर्तता मार्चअखेर पर्यंत करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. या बैठकीतच पेसा कायद्याचाही त्यांनी आढावा घेत, पेसा गावे लवकरच जाहीर करण्याच्या सूचना दिल्या, त्याचबरोबर जी गावे पेसा खाली जाहीर होतील त्या गावांना वीज कंपनीने तत्काळ वीज जोडणी द्यावी, असे आदेशही त्यांनी वीज कंपनीला दिले. या बैठकीस जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, वन व आदिवासी खात्याचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)