कॅनालरोडवरील मगरचाळीत राहणारे मोहम्मद सल्लाउद्दीन राहिन यांच्या फिर्यादीनुसार, जेलरोड साईमूर्ती इमारतीत त्यांचे मुस्कान नावाचे टेलरिंगचे दुकान आहे. राहीन हे शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास दुकानात कारागिरासोबत असताना दोन अनोळखी युवक दुकानात आले. ‘तुम्ही ढिकले नावाच्या मुलीला मोबाईलवर फोन का करता..’ अशी विचारणा केली. मोहम्मद यांनी मी कोणाला फोन करत नाही. तुमच्या दुकानात यापूर्वी कामाला असलेला मोहम्मद इर्शादचा फोन येत असल्याचे सांगत दोन युवकांनी मोहम्मद राहीन व फिरोजला मारहाण केली. राहीन हे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. त्यानंतर दोन युवकांनी त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून कपड्यांना आग लावली. दुकानाशेजारील व्यक्तीने राहीन यांना आग लागल्याचे सांगितले. राहीन तातडीने आले; मात्र तोपर्यंत दुकानातील कपडे जळाले होते. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दोघा अज्ञात युवकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
बळजबरीने दुकानात शिरुन कपडे पेटविले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:31 IST