शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

जबरदस्तीने प्लॉटचा कब्जा; महंताला ग्यानदासांची समज

By admin | Updated: August 9, 2015 22:59 IST

क्षमायाचना : मकवानांच्या जागेत बारा खालसे

नाशिक : दिगंबर अनी आखाड्याला दिले जाणारे प्लॉट जबरदस्तीने ताब्यात घेणारे निर्मोही आखाड्याचे महामंत्री महंत श्यामसुंदरदास यांना आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी समज देत त्यांच्याकडील प्लॉटचे फेरवाटप केले. यावेळी महंत श्यामसुंदरदास यांनी झाल्या प्रकाराबद्दल क्षमायाचनाही केली.महापालिकेने उपलब्ध करून दिलेले प्लॉट शनिवारी दिगंबर अनी आखाड्याला वाटप केले जाणार होते. प्रत्यक्ष वाटप करताना साधूंची मोठी गर्दी होऊन अन्य अनी आखाड्यांच्या महंतांनी सदर प्लॉट परस्पर ताब्यात घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. ज्यांच्यासाठी प्लॉट उपलब्ध करून दिले जाणार होते त्यांनी महंत ग्यानदासांकडे मध्यस्थीची विनंती केली होती. त्यानुसार महंत ग्यानदासांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली आणि दिगंबर अनीत सर्व प्रमुख अनींच्या महंतांची बैठक घेतली. त्यात जबरदस्तीने जागा घेणारे महंत श्यामसुंदरदास यांना ग्यानदास यांनी साधू असूनही सहकारी साधूंशी वाद घातल्याबद्दल समज दिली. तेव्हा श्यामसुंदरदास यांनी क्षमा मागितली. त्यानंतर या प्लॉटचे फेरवाटप झाले. बैठकीला दिगंबर अनीचे महंत रामकिशोरदास शास्त्री, निर्वाणी अनीचे महंत धर्मदास, महंत किसनदास, महंत ग्यानदास यांचे उत्तराधिकारी महंत संजयदास, महंत हेमंतदास, महंत भक्तिचरणदास, महंत परमात्मादास, जनार्धनदास यांच्यासह महापालिकेचे कार्यकारी अभियंता बी. यू. मोरे, उपअभियंता पगारे, घोलप आदि उपस्थित होते. दरम्यान, उद्योजक हरिषभाई मकवाना यांनी काठे औद्योगिक वसाहतीतील आपली स्वत:ची जागा उपलब्ध करून दिली असून, त्यात बारा खालशांची व्यवस्था होणार आहे.

दिगंबर अनी आखाड्याला दिलेले प्लॉट जबरदस्तीने घेतल्याबद्दल महंत श्यामसुंदर यांना समज देताना महंत ग्यानदास. समवेत महंत रामकिशोरदास शास्त्री, महंत धर्मदास, महंत किसनदास, भक्तिचरणदास, महंत परमात्मादास आदि.