शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांचे वेतन वाढीसाठी अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 21:32 IST

वाडिव-हे : गोन्दे औद्योगिक वसाहतीतिल सॅमसोनाइट साऊथ एशिया प्रा.ली.कंपनीतिल कामगार व व्यवस्थापन यांच्यात जानेवारी २०१८ पासून नवीन वेतन कराराची बोलणी सुरु असून कंपनी व्यवस्थापन आणि कामगार यांच्यातील बोलणी फिस्कटल्याने कामगारांनी काम सुरु ठेवून अंतर्गत उपोषण सुरु केले असल्याची माहिती कामगारानी निवेदनाद्वारे दिली आहे.

ठळक मुद्देइगतपुरी : सॅमसोनाइट कंपनीच्या कामगारांचे वेळेत काम सुरुच

वाडिव-हे : गोन्दे औद्योगिक वसाहतीतिल सॅमसोनाइट साऊथ एशिया प्रा.ली.कंपनीतिल कामगार व व्यवस्थापन यांच्यात जानेवारी २०१८ पासून नवीन वेतन कराराची बोलणी सुरु असून कंपनी व्यवस्थापन आणि कामगार यांच्यातील बोलणी फिस्कटल्याने कामगारांनी काम सुरु ठेवून अंतर्गत उपोषण सुरु केले असल्याची माहिती कामगारानी निवेदनाद्वारे दिली आहे.इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला औद्योगिक वसाहतीतिल सॅमसोनाइट साऊथ एशिया ही नामांकित कंपनी आहे,या कंपनीतिल कामगार सीटू कामगार संघटनेचे सभासद आहेत. १९९७ पासून ते २०१७ या कालावधीत पाच वेतनवाढीचे करार आतापर्यंत झाले आहेत. मागील कराराची मुदत संपल्याने कामगारांनी वेतनवाढ करार करण्यासाठी बोलणी सुरु केली. कंपनी प्रशासनाने उत्पादन वाढीसाठी आग्रह धरला, कामगारांनी उत्पादन वाढ सुरु केली मात्र कंपनी प्रशासन आणखी उत्पादन वाढीची मागणी करत असल्याने बोलणी फिस्कटली त्यामुळे उपोषणाचा मार्ग अवलंबिल्याचे कामगारांनी सांगितले.त्यामुळे कायम स्वरूपी कामगारांनी औद्योगिक शांतता कायम रहावी यासाठी कामकाज सुरळीत ठेवून व उत्पादन सुरु ठेवून कंपनीच्या वेळेत काम करत असतांना अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. त्यामध्ये चहा, नाश्ता जेवण न करण्याचा निर्णय घेवून कंपनीअंतर्गत उपोषणाचा मार्ग अवलंबला असल्याची माहिती निवेदनाद्वारे दिली आहे. निवेदनाच्या प्रति तहसीलदार, कामगार उपायुक्त, पोलिस स्टेशन, कंपनी प्रशासन यांना देण्यात आल्याची माहिती कामगार प्रतिनिधीने दिली आहे.