शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

मॉल संस्कृ ती फोफवावी या दृष्टीनेच अन्नसुरक्षा कायदा

By admin | Updated: November 15, 2014 01:00 IST

मॉल संस्कृ ती फोफवावी या दृष्टीनेच अन्नसुरक्षा कायदा

नाशिक : सामान्य व्यावसायिकाच्या समस्या समजून न घेता केवळ मॉल संस्कृ ती फोफवावी या दृष्टीनेच अन्नसुरक्षा कायदा बनविला गेला असल्याचा आरोप महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरचे अध्यक्ष रामचंद्र भोगले यांनी येथे केला़ गंगापूररोडवरील कुर्तकोटी सभागृह येथे नाशिक धान्य किराणा किरकोळ व्यापारी संघटनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी सभापती अरुण गुजराथी होते़ भोगले म्हणाले, एलबीटी तसेच अन्नसुरक्षा कायद्यातील जाचक अटींबाबत ते करणाऱ्यांची जागृती करण्याचा प्रयत्न करत आहे; परंतु त्यांची मानसिकता जाणून घेतल्याशिवाय व ती बदलल्याशिवाय या कायद्यामध्ये बदल होणार नाही़ तसेच आपल्यातून निवडून जाणारे लोकप्रतिनिधी या कायद्यांना का मान्यता देतात हे पाहण्याची वेळ आली आहे़ नवे सरकार सर्वांना बरोबर घेऊन बदल घडवून आणण्याचे आश्वासन देत आहे, तर आपण व्यापाऱ्यांनीही सरकारने आपणावर विश्वास ठेवावा असा व्यवसाय करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले़ अरुण गुजराथी म्हणाले, व्यापार केवळ पैशांवर चालत नाही, त्याला पैशाच्या भांडवलाप्रमाणे विश्वासाचेही भांडवल लागते़ ग्राहक हे पैसा कमावण्याचे साधन नाही, तर व्यवसाय ही एक सेवा आहे़ यामुळे ग्राहकाला न फसवता आपला व्यवसाय वाढविण्याची गरज आह़े शासन हे करांशिवाय चालू शकत नाही़ उद्या शासनाने एलबीटी बंद केला तरी दुसरा कर सुरू करेलच. यासाठी सर्व संघटनांची एकजूट व्हावी़ स्पर्धा आणि सहकार्य हेच आपले जीवन आहे़ संघटनेने स्वत:चा ब्रॅण्ड निर्माण करण्याचा प्रयत्न करावा़ याप्रसंगी उपस्थितांच्या हस्ते सभासद सूचीचे प्रकाशन करण्यात आले़ तसेच संघटनेचे अध्यक्ष अरुण जातेगावकर यांचा विशेष सत्कार अरुण गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आला़ यावेळी प्रवीण मसालेचे संचालक हेमंत राठी, महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, दिलीप साळवेकर, घाऊक व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, राजन दलवानी, नंदकुमार कर्पे, चंद्रकांत दीक्षित आदि उपस्थित होते़