शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक संस्थांकडून गरजूंना अन्नाची पाकिटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 21:15 IST

येवला : कोरोनामुळे रोजगार गमावलेल्या कष्टकरी, मजूर, बेघर नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून या घटकांसाठी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अन्नाची पाकिटे व पाणी उपलब्ध करून दिले आहे.

ठळक मुद्देयेवला : सातत्याने दोन महिने उपक्रम चालविण्याचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : कोरोनामुळे रोजगार गमावलेल्या कष्टकरी, मजूर, बेघर नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून या घटकांसाठी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अन्नाची पाकिटे व पाणी उपलब्ध करून दिले आहे.तहसीलदार रोहिदास वारूळे यांनी शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सामाजिक संस्थांना अन्नदान सहभागाबाबत आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत यातून येवला कांदा व्यापारी असोसिएशन, माणुसकी फाउण्डेशन व येवला सोशल मीडिया फोरम या तीन संस्थांनी एकत्र येत स्वत: अन्न शिजवून ते पाकिटातून वितरण करण्याची जबाबदारी स्वीकारली. यात कांदा व्यापारी असोसिएशनने शिधा बनविण्याचा संपूर्ण खर्च उचलला असून, त्यांच्याकडील तयार अन्नाची पाकिटे माणुसकी फाउण्डेशन व येवला सोशल मीडिया फोरमचे कार्यकर्ते गरजूंपर्यंत पोहोचवित आहेत. सुमारे दोन महिने हा उपक्र म सातत्याने चालविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अन्न पाकिटे वितरित करताना राहुल लोणारी, किरणसिंग परदेशी, योगेश सोनवणे, सुभाष गांगुर्डे, तरंग गुजराथी, भूषण शिनकर, अक्षय तांदळे आदी कार्यकर्ते मास्क, हॅण्डग्लोज घालून आपली सुरक्षा व योग्य अंतर राखून कर्तव्य पार पाडीत आहेत.माणुसकी फाउण्डेशनचे अल्केश कासलीवाल, येवला सोशल मीडिया फोरमचे समन्वयक अविनाश शिंदे या उपक्र माचे नियोजन करीत असून, नागरिकांकडून या संस्था व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले जात आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsinnar-acसिन्नर