कसबे सुकेणे : महाराष्ट्राची परंपरा जोपासणाºया ग्रामीण भागातील तो उत्साह कमी होत असला, तरी जत्रांमधील खाद्यपदार्थांची रेलचेल आणि विक्री आजही कायम असल्याचे चित्र निफाड तालुक्यातील मौजे सुकेणे येथील दत्त यात्रेतील हलवाई गल्लीत दिसून येते. या यात्रेतील जिलेबी, भत्ता आणि गोडीशेव, रेवड्या व गुढीपाडव्याचे हार-कडे जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. प्रतिगाणगापूर श्रीक्षेत्र मौजे सुकेणे येथील दत्त प्रभू यात्रोत्सवाच्या तिसºया दिवशीही भाविकांची गर्दी कायम होती. सुकेणेच्या यात्रेतील जिलेबी, भत्ता, गोडीशेव, रेवड्या आणि पाडव्याचे हार-कडे सर्वदूर प्रसिद्ध आहे. त्यामुळे या यात्रेत जिल्ह्यातील नामवंत हलवाई आपली दुकाने थाटात असतात. यंदाही यात्रेतील खाऊ गल्लीमध्ये जिलेबीचा गोडवा आणि तिचा दरवळ कायम असून, लालबुंद गोडीशेव, तीळाने भरलेल्या गुळाच्या रेवड्या आणि कुरकुरीत खमंग भत्ता आजही यात्रेकरूंचे आकर्षण आहे. सुकेणेची दत्त यात्रा तीन दशकांपूर्वी आठ ते पंधरा दिवस चालत असे. संपूर्ण जिल्ह्यातून भाविक बैलगाडीने दरमजल करीत या यात्रेत मुक्काम ठोकत दत्तचरणी नतमस्तक व्हायचे. परंतु अलीकडच्या ‘फोर जी’च्या युगात गावाकडच्या जत्राही नळीने लाइव्ह होत असून, दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपल्या आहे. मौजे सुकेणेची जत्राही त्याला अपवाद नाही. सुकेणेच्या दत्त यात्रेतील जिलेबीची ख्याती थेट मुंबईपर्यंत आहे. मुंबई आणि कसारा, इगतपुरी, घोटी या भागातील भाविक रेवड्या, गोडीशेव आणि जिलेबी आवर्जून खरेदी करतात. यात्रेत श्रीवास्तव बंधूंची केसरीलाल जिलेबी भाविकांत प्रसिद्ध आहे.
खाद्यपदार्थांची रेलचेल : भत्त्याचीही मोठ्या प्रमाणात विक्र ी सुकेणेच्या यात्रेतील जिलेबीचा गोडवा सर्वदूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 12:09 AM
कसबे सुकेणे : महाराष्ट्राची परंपरा जोपासणाºया ग्रामीण भागातील तो उत्साह कमी होत असला, तरी जत्रांमधील खाद्यपदार्थांची रेलचेल आणि विक्री आजही कायम आहे.
ठळक मुद्देयात्रोत्सवाच्या तिसºया दिवशीही भाविकांची गर्दी कायम जिल्ह्यातील नामवंत हलवाई दुकाने थाटतात