शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
3
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
4
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
5
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
6
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
7
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
8
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
9
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
10
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
11
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
12
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
13
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
14
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
15
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
16
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
17
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
18
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
19
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
20
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!

नियम पाळा... अन्यथा दंडात्मक कारवाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 01:22 IST

विंचूर : नाशिक जिल्ह्यात निफाड तालुका कोरोनाचा ह्यहॉटस्पॉटह्ण ठरलेला असतानाही येथे आस्थापनांकडून शासनाने घालून दिलेले नियम पाळले जात नसल्याने ग्रामपालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देविंचूर : जिल्हा परिषद अधिकाऱ्यांकडून पाहणी

विंचूर : नाशिक जिल्ह्यात निफाड तालुका कोरोनाचा ह्यहॉटस्पॉटह्ण ठरलेला असतानाही येथे आस्थापनांकडून शासनाने घालून दिलेले नियम पाळले जात नसल्याने ग्रामपालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे.जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांच्यासह गटविकास अधिकारी संदीप कराड, लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी विंचूर येथे भेट देऊन कोविड संदर्भात गावात पाहणी केली. गेल्यावर्षी जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण निफाड तालुक्यातील विंचूर-लासलगावजवळ असलेल्या पिंपळगाव नजीक या गावात आढळला होता. मात्र, असे असतानाही ग्रामीण भागात काही नाही, असे म्हणून चालढकल करणाऱ्यांवर आता कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.गेल्या आठवड्यापासून सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंतच आस्थापने उघडण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मात्र, असे असताना येथे सायंकाळी सातनंतर मोठ्या संख्येने दुकाने सुरू असतात. सायंकाळी गर्दी कमी होईल, अशी अपेक्षा असतानाही येथे सायंकाळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची वर्दळ असते.-------------------------------ग्रामपालिकेकडून जनजागृतीशासनाने घालून दिलेले नियम पाळले जात नसल्याने यापुढे नियम न पाळणार्‍या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. अजूनही बरेचसे ग्रामस्थ मास्क वापरताना दिसून येत नाहीत. अनेकजण घरातून निघताना मास्क घालून बाहेर निघतात आणि एकत्र आले की, मास्क काढून बोलत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मास्क हनुवटीवर ठेवून सुशिक्षित म्हणवून घेणाऱ्यांनीही काळजी घेण्याची गरज आहे. ग्रामपालिकेच्यावतीने वेळोवेळी दवंडी देऊन जनजागृती केली जात असून, बुधवारी येथे चार कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.शासन नियमाप्रमाणे सायंकाळी सातनंतर दुकाने बंद केली पाहिजेत. मात्र, बहुतांशी व्यावसायिकांकडून त्याचे पालन होत नसल्याने अशा व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. - जी. टी. खैरनार, ग्रामविकास अधिकारी, विंचूरविंचूर येथे कोविड संदर्भात जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, गटविकास अधिकारी संदीप कराड, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ आदींनी पाहणी केली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgram panchayatग्राम पंचायत