शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आचाºयांकडून फराळ बनवून घेण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:13 IST

दिवाळी सुरू झाली असून, कच्चा माल देऊन आचाºयांकडून फराळाचे पदार्थ करून घेण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. लक्ष्मीपूजनापासून अनेकांना कार्यालयीन सुट्या मिळणार असल्याने आणि पुरेसा वेळ हाती नसल्याने या पर्यायाचा स्वीकार होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. श्रम, वेळेची बचत होत असल्याने आणि आपल्या घरचेच घटक पदार्थ वापरून आपल्या नजरेसमोर फराळाचे पदार्थ तयार करून मिळत असल्याने हा पर्याय महिलावर्गात लोकप्रिय होत चालला आहे.

नाशिक : दिवाळी सुरू झाली असून, कच्चा माल देऊन आचाºयांकडून फराळाचे पदार्थ करून घेण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. लक्ष्मीपूजनापासून अनेकांना कार्यालयीन सुट्या मिळणार असल्याने आणि पुरेसा वेळ हाती नसल्याने या पर्यायाचा स्वीकार होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. श्रम, वेळेची बचत होत असल्याने आणि आपल्या घरचेच घटक पदार्थ वापरून आपल्या नजरेसमोर फराळाचे पदार्थ तयार करून मिळत असल्याने हा पर्याय महिलावर्गात लोकप्रिय होत चालला आहे.  ठिकाठिकाणी आचारी भट्ट्या लावल्या असून सकाळपासून चिवडा, शेव, चकली, करंजी, अनारसे, कडबोळ्या, पापड्या, मठरी, लाडू असे पदार्थ बनवून घेतले जात आहेत. बनवून देण्याचे दर किफायतशीर असल्याने महिलावर्गाकडून या प्रकाराला पसंती दिली जात आहे. काही वर्षांपासून घरी फराळ बनविण्याऐवजी कच्चा माल देऊन फराळ करून घेण्याकडे महिलांचा कल वाढला आहे. त्यामुळे आचारीकडे महिलावर्गाची गर्दी वाढत आहे.  दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घराघरात आवरासावर, सजावट, खरेदी आदींची धावपळ दिसून येत आहे. दिवाळीत फळालाही तितकेच महत्त्व आहे, परंतु दिवसेंदिवस वाढणाºया महागाईमुळे मुलांचे शिक्षण, किराणा, आजारपण, घरसंसार चालण्यासाठी पतीबरोबरच महिलावर्गही नोकरी करतात. त्यामुळे घरी फराळाची तयारी करणे अशक्य होऊ लागले आहे. त्यासाठी बहुतेक किराणा दुकानांसमोर आचारी फराळ साहित्य घेऊन समोरच फराळ तयार करून देत आहेत. महिला वर्गाचे कामही सोपे होत आहे.शेव, चिवडा, शंकरपाळे, चकली यांसह विविध फराळांचे पदार्थ तयार करून घेण्यासाठी सकाळपासून सायंकाळपर्यंत महिलावर्ग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.   सदर पदार्थ आचारी किलोच्या भावाने करून देत असल्याने वेळ आणि आर्थिक फायदा होत असल्याचे महिलांचे म्हणणे आहे. याचप्रमाणे किराणा, इंधन, वेळ, श्रम या साºयांचे गणित करून येणारा खर्च लक्षात घेता दुकाने, बचतगटांचे मेळावे आदी ठिकाणांहून फराळाचे तयार पदार्थ घेण्यावरही भर दिला जात आहे.    गरजेनुसार व आवडीनुसार अर्धा किलो ते ५ किलोपर्यंत चिवडा, चकली, शेव, करंजी आदी माल विकत घेतला जात आहे.