शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष लक्ष उजळले दीप...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 01:14 IST

सज्जनांचे रक्षण करीत दुष्टांचे निर्दलन करा, असा सामाजिक संदेश देणाºया त्रिपुरारी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी गंगापूर रोडवरील सोमेश्वर येथील श्री बालाजी मंदिराच्या प्रांगणात लक्ष लक्ष दिव्यांच्या प्रकाशाने बालाजी मंदिर उजळून निघाले. पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या हजारो नाशिककरांनी मोठ्या संख्येने आणि भक्तिभावाने या सोहळ्यात सहभागी होऊन जवळपास एक लाखाहून अधिक दिवे प्रज्वलित केले.

नाशिक : सज्जनांचे रक्षण करीत दुष्टांचे निर्दलन करा, असा सामाजिक संदेश देणाºया त्रिपुरारी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी गंगापूर रोडवरील सोमेश्वर येथील श्री बालाजी मंदिराच्या प्रांगणात लक्ष लक्ष दिव्यांच्या प्रकाशाने बालाजी मंदिर उजळून निघाले. पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या हजारो नाशिककरांनी मोठ्या संख्येने आणि भक्तिभावाने या सोहळ्यात सहभागी होऊन जवळपास एक लाखाहून अधिक दिवे प्रज्वलित केले. या दिव्यांच्या प्रकाशाने मंदिर आणि संपूर्ण परिसर एका अनोख्या झळाळीने उजळून निघाला होता.त्रिपुरारी पौर्णिमा, तुळशीविवाह आणि कार्तिक महोत्सव या धार्मिक कार्यक्र मांच्या त्रिवेणी सोहळ्यानिमित्त शहरभरात भाविकांची मांदियाळी आणि दीपोत्सवाचा लखलखाट दिसून आला. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी त्रिपूर असुराचा संहाराच्या पार्श्वभूमीवर शिव मंदिरात वाती लावणे, वाती जाळणे, दीपपात्री दान करणे अशाप्रकारे ही पौर्णिमा साजरी करण्यात येते.नाशिकमध्ये बालाजी मंदिरातही हा दीपोत्सव साजरा केला जात असून, १२ वर्षांपासून येथे दिवे प्रज्वलित करून त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते. सुरुवातीला पाच हजार पणत्यांनी सुरुवात झालेल्या या दीपोत्सवात आता एक लाखाहून अधिक दिवे प्रज्वलित केले जात आहेत. यावर्षी सामाजिक कार्यकर्ते हेमंत बक्षी व गलानी देवी यांच्या हस्ते प्रथम दीपप्रज्वलन करून दीपोत्सवाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर एकामागून एक येणाºया नाशिककरांनी जवळपास ४५ डबे तेल वापरून लाखो दिवे प्रज्वलित केले, तर महिलांनी एकत्रित हजारो वाती पेटवून पूजा केली. बालाजी मंदिराचा गाभारा व मंदिराची सजावट पणत्यांनी करण्यात आली होती. हळूहळू अवघा परिसर दिव्यांच्या प्रकाशाने झळाळून निघाला. यावेळी शंकराचार्य न्यासचे अध्यक्ष आशिष कुलकर्णी, कार्यवाह प्रमोद भार्गवे, आनंद जोशी, राजाभाऊ मोगल, अशोक खोडके, नरेंद्र चांदवडकर आदी उपस्थित होते. मंदिर परिसरातील दीपरचना अवधूत देशपांडे यांनी केली होती.