शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
4
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
5
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
6
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
7
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
8
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
9
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
10
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
11
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
12
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
13
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
14
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
15
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
16
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
17
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
18
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
19
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
20
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक

महामार्गावरील उड्डाणपूल महिनाभरात होणार खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:16 IST

.नाशिक : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-३ वरील के.के. वाघ ते कोणार्कनगर दरम्यान सुरू असलेला उ्ड्डाणपूल पुढील महिन्यात खुला होणार असल्याने ...

.नाशिक : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-३ वरील के.के. वाघ ते कोणार्कनगर दरम्यान सुरू असलेला उ्ड्डाणपूल पुढील महिन्यात खुला होणार असल्याने महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार आहे. मागीलवर्षी कोरोनामुळे मजूर गावी गेल्याने येथील कामाला मे २०२१ महिन्यांपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. यंदाही कामला कोरोनाचा फटका बसला असला तरी सद्यस्थितीत पुलाचे काम जवळपास ९२ टक्के काम पुर्ण झाल्याने पुढील महिन्यात उ्डाणपूल खुले करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मुंबंई-आग्रा महामार्गावर के.के. वाघ ते कोणार्कनगर मार्गावर वाढलेली वर्दळ तसेच सातत्याने होणाऱ्या अपघातामुळे या मार्गावर उड्डाणपुलाच्या कामाला २०१८ मध्ये सुरूवात झाली होती. काम सुरू झाल्यापासून २४ महिन्यांत काम पुर्ण करण्याची मुदत देण्यात आलेली होती. म्हणजेच ऑक्टेाबर २०२० मध्ये या पुलाचे काम पुर्ण होऊन वाहतुकीस खुला होणे अपेक्षित होते. परंतु मागीलवर्षी कोरेानाच्या संकटामुळे मजूर आपापल्या गावी निघून गेल्याने येथील कामकाजावर परिणाम झाला. दोन ते अडीच महिने कामगार परतलेच नसल्याने कामकाजाची गती काहीशी मंदावली होती. अशाही परिस्थितीत मोजक्याच कामगारांच्या भरवशावर कामकाज सुरू होते. त्यानुसार मे महिन्यात उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केले होते. मात्र पुन्हा एकदा कारोनाचा फटका बसल्याने मे महिन्याचा मुहूर्त टळला.

दुसऱ्या लाटेतही उ्डाणपुलाच्या कामाला केारोनाची बाधा झाली. मजूर संख्या घटली तर काही अभियंते बाधीत झाल्याने कामकाजावर परिणाम झाला. तारीही सुमारे दिडशे कामगारांवर काम सुरूच ठेवण्यात आले. कोरेाना नियमांचा कुठेही भंग होणार नाही अशा पद्धतीने कामकाजाचे नियोजन करण्यात आले असल्याचे महमार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. यापुर्वी देण्यात आलेली मुदत संपुष्टात आली असली तरी थोडेच काम शिल्लक राहिल्याने पुढील महिन्यात पूल खुला करण्यात येणार आहे.

पुलाच्या कामकाजला अनेकदा कोरोनाच्या अडचणी आल्या असतानाही वाढीव मुदतीपेक्षा केवळ एक महिना उशिराने उड्डाणपुलाचे कामकाज पूर्ण करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत काही मजूर तसेच अभियंते कोरोनाने प्रभावित झाल्याने तसेच काही मजूर कामावर हजर राहत नसल्याने कामकाजावर काहीसा परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु सातत्यपूर्ण कामाच्या नियोजनातून कामकाज पूर्णत्वास येत आहे. अवघ्या काही दिवसात येथील पुलाचे काम पूर्ण होऊन उड्डाणपूल खुला होणार आहे.

--कोट--

कोरोनाच्या दुसल्या लाटेचा कामगारांच्या उपस्थितीवर परिणाम झाला. कामगारांचा प्रश्न काही प्रमाणात निर्माण झाला असला तरी कामातील सातत्यामुळे काम पुर्णत्वास येत आहे. के.के. वाघ जवळील एक जॉईन्ट करण्याचे काम तेवढे शिल्लक असून येत्या काही दिवसात ते पुर्ण होणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यात उडडाणपुलाचे काम पुर्ण होणार आहे.

- दिलीप पाटील, राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधीकरण, तांत्रिक प्रबंधक

-

(फोटो:१७ मे ९२ते९९)