शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील उड्डाणपूल महिनाभरात होणार खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:16 IST

नाशिक: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-३ वरील के. के. वाघ ते कोणार्कनगर दरम्यान सुरू असलेला उ्ड्डाणपूल पुढील महिन्यात खुला होणार असल्याने ...

नाशिक: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-३ वरील के. के. वाघ ते कोणार्कनगर दरम्यान सुरू असलेला उ्ड्डाणपूल पुढील महिन्यात खुला होणार असल्याने महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार आहे. मागीलवर्षी कोरेानामुळे मजूर गावी गेल्याने येथील कामाला मे २०२१ महिन्यांपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. यंदाही कामाला कोरोनाचा फटका बसला असला तरी सद्य:स्थितीत पुलाचे काम जवळपास ९२ टक्के काम पूर्ण झाल्याने पुढील महिन्यात उड्डाणपूल खुले करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर के. के. वाघ ते कोणार्कनगर मार्गावर वाढलेली वर्दळ तसेच सातत्याने होणाऱ्या अपघातामुळे या मार्गावर उड्डाणपुलाच्या कामाला २०१८ मध्ये सुरुवात झाली होती. काम सुरू झाल्यापासून २४ महिन्यांत काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आलेली होती म्हणजेच ऑक्टेाबर २०२० मध्ये या पुलाचे काम पूर्ण होऊन वाहतुकीस खुला होणे अपेक्षित होते. परंतु मागीलवर्षी कोरेानाच्या संकटामुळे मजूर आपापल्या गावी निघून गेल्याने येथील कामकाजावर परिणाम झाला. दोन ते अडीच महिने कामगार परतलेच नसल्याने कामकाजाची गती काहीशी मंदावली होती. अशाही परिस्थितीत मोजक्याच कामगारांच्या भरवशावर कामकाज सुरू होते. त्यानुसार मे महिन्यात उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केले होते. मात्र, पुन्हा एकदा काेरोनाचा फटका बसल्याने मे महिन्याचा मुहूर्त टळला.

दुसऱ्या लाटेतही उ्डाणपुलाच्या कामाला कोरोनाची बाधा झाली. मजूर संख्या घटली तर काही अभियंते बाधित झाल्याने कामकाजावर परिणाम झाला तरीही सुमारे दीडशे कामगारांवर काम सुरूच ठेवण्यात आले. कोरेाना नियमांचा कुठेही भंग होणार नाही अशा पद्धतीने कामकाजाचे नियोजन करण्यात आले असल्याचे महमार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. यापूर्वी देण्यात आलेली मुदत संपुष्टात आली असली तरी थोडेच काम शिल्लक राहिल्याने पुढील महिन्यात पूल खुला करण्यात येणार आहे.

पुलाच्या कामकाजला अनेकदा कोरोनाच्या अडचणी आल्या असतानाही वाढीव मुदतीपेक्षा केवळ एक महिना उशिराने उड्डाणपुलाचे कामकाज पूर्ण करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत काही मजूर तसेच अभियंते कोरोनाने प्रभावित झाल्याने तसेच काही मजूर कामावर हजर राहत नसल्याने कामकाजावर काहीसा परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात होती; परंतु सातत्यपूर्ण कामाच्या नियोजनातून कामकाज पूर्णत्वास येत आहे. अवघ्या काही दिवसांत येथील पुलाचे काम पूर्ण होऊन उड्डाणपूल खुला होणार आहे.

--कोट--

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कामगारांच्या उपस्थितीवर परिणाम झाला. कामगारांचा प्रश्न काही प्रमाणात निर्माण झाला असला तरी कामातील सातत्यामुळे काम पूर्णत्वास येत आहे. के.के. वाघ जवळील एक जॉईंट करण्याचे काम तेवढे शिल्लक असून येत्या काही दिवसांत ते पूर्ण होणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यात उड्डाणपुलाचे काम पूर्ण होणार आहे.

- दिलीप पाटील, राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधीकरण, तांत्रिक प्रबंधक

((फोटो:१७ मे ९२ते९९)