शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

विल्होळीत दोन कं पन्यांना आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 23:02 IST

विल्होळी : गावाच्या शिवारात अंबड-बिल्लोरी रस्त्यावरील असलेल्या दोन कंपन्यांना अचानकपणे आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाने वेळीच धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी उशिरा पोहचल्याने आगीने रौद्रावतार धारण केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

ठळक मुद्देलाखोंचे नुकसान : दोन तासांनंतर आगीवर नियंत्रण

विल्होळी : गावाच्या शिवारात अंबड-बिल्लोरी रस्त्यावरील असलेल्या दोन कंपन्यांना अचानकपणे आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाने वेळीच धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी उशिरा पोहचल्याने आगीने रौद्रावतार धारण केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.होळी परिसरातील अंबड-बिल्लोरी रस्त्यावरील ए.आर. व स्क्रॅप जंक्शन या कंपन्यांच्या परिसरातील साहित्य पेटल्याची घटना घडली. सकाळच्या सुमारास उघड्यावर नैसर्गिक विधीसाठी गेलेल्यांपैकी अज्ञात इसमाने धूम्रपान करताना जळती आगकाडी अथवा बिडी, सिगारेटचे थोटके खाली फेकून दिल्यामुळे वाळलेले गवत पेटत-पेटत दोन्ही कंपन्यांच्या आवारापर्यंत पोहचले.यावेळी कंपन्यांच्या आवारात असलेल्या टायरसारख्या टाकाऊ साहित्याने पेट घेतल्याने आगीने क्षणार्धात रौद्रावतार धारण केला. यावेळी परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला.घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळविल्यानंतर सिडको उपकेंद्राचा बंबासह जवान घटनास्थळी दाखल झाले. सिडको बंबाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न क रूनही आग आटोक्यात येत नव्हती, काही वेळेत सातपूरचा बंब घटनास्थळी पोहचला. त्यावेळी जवानांनी पाण्याचा मारा करत आग विझविली. अंबड औद्योगिक वसाहत घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर असून, महापालिका व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करून या औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्ररीत्या नवीन अग्निशमन उपकेंद्र स्थापन करण्याची गरज असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले.विल्होळी येथे आग लागल्याची खबर आम्हास मुख्यालयाकडून ११ वाजून ४९ मिनिटांनी प्राप्त झाली; मात्र घटनास्थळ महापालिका हद्दीबाहेर असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांची जोपर्यंत परवानगी प्राप्त होत नाही तोपर्यंत, बंब केंद्रातून काढता येत नाही. वरिष्ठांना घटनेचे स्वरूप कळवून परवानगी घेत ११ वाजून ५२ मिनिटाला आम्ही सिडको उपकेंद्रातून बंब घेऊन विल्होळीच्या दिशेने मार्गस्थ झालो. - ए. एस. सोनवणे, फायरमन