शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

नद्यांना पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2016 22:18 IST

पेठ, दिंडोरीत पाऊस : तालुक्याचा संपर्क तुटला

पेठ : मंगळवार सकाळपासून पेठ तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नाशिक-पेठ महामार्ग वगळता सर्व रस्ते बंद पडल्याने जवळपास निम्म्या तालुक्याचा संपर्क तुटला आहे.मंगळवारी सकाळपासूनच मुसळधार पावसाने सुरु वात केल्याने पेठ -जोगमोडी रस्त्यावर संगमेश्वरनजीक पुलावर पाणी आल्याने जवळपास पूर्वेकडील निम्म्या तालुक्याचा पेठशी संपर्क तुटला, तर उस्थळेजवळ नदीला मोठा पूर आल्याने उस्थळे, हनुमंतपाडा, हेदपाडा, एकदरेकडील वाहने व नागरिक अडकून पडले. दिवसभर झालेल्या अतिवृष्टीने संपूर्ण तालुका जलमय झाला.भुवन घाट वाहतुकीसाठी बंदपेठच्या पश्चिमेकडील भुवन घाटात दोन-तीन ठिकाणी दगड-माती रस्त्यावर आल्याने घाटाखालील भुवन, आंबापाणी, खडकी, खामशेत, बोरपाडा, धानपाडा आदि पंधरा ते वीस गावांची या रस्त्यावरील वाहतूक खोळंबली असून, पेठला येण्यासाठी आडगाव मार्गे वळसा घालून यावे लागत आहे.पेरण्या जोमाने सुरूनांदगाव : तालुक्यात पेरण्या जोमाने सुरू असून, या आठवड्यात १०० टक्के पेरण्या पूर्ण होतील, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी अशोक कुळधर यांनी दिली. दि. ११ जुलैपर्यंत तालुक्याची पर्जन्य सरासरी १४२ मि.मी. आहे. नांदगाव मंडूलात २२१ मि.मी. व मनमाड मंडलात १५० मि.मी. पर्जन्याची नोंद झाली आहे. यंदा कापसाचे क्षेत्र कमी (९६३९ हे.) झाले आहे. कृषी विभागाच्या आंतरपीक प्रचाराला यश आले असून, कडधान्याची (तूर, मूग, उडीद) तीन हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मक्याच्या क्षेत्रात काहीशी वाढ झाली असून, २८,५०० हेक्टर मका क्षेत्र आहे. बाजरी १६,००० हेक्टर, तर भुईमूग १००० हेक्टर आहे. यंदाचे एकूण पेरणी उद्दिष्ट ५८,५०० हेक्टर ठरविण्यात आले असल्याची माहिती कुळधर यांनी दिली. मनमाड विभागात उशिरा पाऊस सुरू झाल्याने तेथील पेरणीची कामे उशिरा सुरू झाली आहेत. तालुक्याच्या पूर्व भागात जातेगाव व वेहेळगाव परिसरात पर्जन्यमान तुलनेने अधिक आहे. (लोकमत ब्युरो)