शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

भक्तीचा महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 23:51 IST

तुच सुखकर्ता... तुच दुखहर्ता..., देवा श्रीगणेशा... गणराज रंगी नाचतो... कोटी-कोटी रूपे तुझी..., आला-आला माझा गणराज आला... अशा एकापेक्षा एक सरस भक्तिगीतांनी दुमदुमलेले वातावरण अन् गणेशभक्तांची आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी उसळलेल्या गर्दीमुळे रविवारी (दि.३) शहरात सायंकाळी भक्तीचा महापूर पहावयास मिळाला.

नाशिक : तुच सुखकर्ता... तुच दुखहर्ता..., देवा श्रीगणेशा... गणराज रंगी नाचतो... कोटी-कोटी रूपे तुझी..., आला-आला माझा गणराज आला... अशा एकापेक्षा एक सरस भक्तिगीतांनी दुमदुमलेले वातावरण अन् गणेशभक्तांची आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी उसळलेल्या गर्दीमुळे रविवारी (दि.३) शहरात सायंकाळी भक्तीचा महापूर पहावयास मिळाला.बुद्धीची देवता गणरायाचे दहा दिवसांपूर्वी शहरात आगमन झाले. बाप्पांच्या आगमनामुळे शहरात भक्तिमय वातावरणाची निर्मिती झालेली पहावयास मिळत आहे. रविवार सुटीचा वार, पावसाने दिलेली उघडीप आणि बाप्पाच्या विसर्जनाला उरलेले दोन दिवस यामुळे सायंकाळपासून गणेशभक्त घराबाहेर पडण्यास सुरुवात झाली होती. रात्री आठ वाजेनंतर मात्र शहरात सर्वत्र गर्दीने उच्चांक गाठला होता. बी.डी. भालेकर मैदान, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, शालिमार, पंचवटी कारंजा, मेनरोड, भद्रकाली, जुने नाशिक, कॉलेजरोड, गंगापूररोड परिसरात विविध सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सवानिमित्त उभारलेले देखावे, आरास तसेच बाप्पांच्या एकापेक्षा एक देखणे रूप बघण्यासाठी भाविकांची गर्दी लोटली होती. भालेकर मैदानाकडे जाणाºया सर्व वाटांवर दुचाकीसह सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला होता. शालिमार, सीबीएस-कान्हेरेवाडी, अण्णा भाऊ साठे चौक या परिसरात बॅरिकेड लावून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मैदानावर केवळ पादचाºयांना प्रवेश दिला जात होता. मुख्य टपाल कार्यालयाच्या पुढे दुतर्फा दुचाकी-चारचाकी भाविकांनी उभ्या केल्या होत्या.