शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जमीनदोस्त : येवल्यात अतिक्र मणधारकांची धांदल अतिक्र मणांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 01:08 IST

येवला : शहरातील शनिपटांगण, विंचूर चौफुली, बसस्थानकासह नगर- मनमाड रोडच्या आजूबाजूला अनेक वर्षे संसार थाटलेल्या दोनशेहून अधिक टपऱ्या, स्टॉल, अशा अतिक्रमणांवर सोमवारी येवला पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला.

ठळक मुद्दे सुमारे २२५ दुकाने जमीनदोस्त केलीप्रत्येक भागातील अतिक्रमणे स्वत:हून काढावीत अशी अपेक्षा

येवला : शहरातील शनिपटांगण, विंचूर चौफुली, बसस्थानकासह नगर- मनमाड रोडच्या आजूबाजूला अनेक वर्षे संसार थाटलेल्या दोनशेहून अधिक टपऱ्या, स्टॉल, अशा अतिक्रमणांवर सोमवारी येवला पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला. मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी हातोडा सुरूच ठेवला आहे. गुरुवारी शनिपटांगण व गणेश मार्केट परिसरात काहींनी स्वत:हून अतिक्रमणे काढून घेतली.अतिक्रमण करू नये अशी तंबी मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी दिली. रस्त्याने वाहतूक सुरळीत चालावी आणि लोकांना पायीदेखील निर्धास्तपणे चालता यावे म्हणून पालिकेच्या अतिक्रमित जागेवर राजकीय आशीर्वादाने निर्धास्तपणे थाटलेली व रहदारीला अडथळा ठरणारी सुमारे २२५ दुकाने जमीनदोस्त केली होती. मुख्याधिकारी यांनी कोणत्याही प्रकारचा पोलीस बंदोबस्त न घेता अतिक्रमण मोहीम राबविली होती. ही अतिक्रमण मोहीम सुरूच राहणार असून प्रत्येक चौकात व गल्लीबोळाने मोकळा श्वास घेण्यासाठी ही मोहीम सुरूच राहणार असल्याच्या पुनरुच्चार नांदूरकर यांनी केला आहे. प्रत्येक भागातील अतिक्रमणे स्वत:हून काढावीत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.