नाशिकरोड : भारत प्रतिभूती चलार्थ पत्र मुद्रणालयातील मजदूर संघाच्या त्रैवार्षिक झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत कामगार पॅनलने आपला पॅनलचा धुव्वा उडवत सर्वच्या सर्व २९ जागांवर विजय संपादित केला. निवडणुकीचा निकाल घोषित होताच कामगार पॅनलच्या समर्थकांकडून आनंदोत्सव साजरा केला गेला.भारत प्रतिभूती चलार्थ पत्र मुद्रणालयातील मजदूर संघाच्या त्रैवार्षिक निवडणुकीकरिता शनिवारी ९५ टक्के मतदान झाले. रविवारी सकाळी ८ वाजता आयएसपी रेस्टशेड येथे मतमोजणीस प्रारंभ झाला. सायंकाळी जाहीर झालेल्या पहिल्या फेरीत कामगार पॅनलच्या सर्व उमेदवारांनी आघाडी मिळवत विजयाकडे वाटचाल करत होते. रात्री ११ वाजेच्या सुमारास निकाल जाहीर होऊन कामगार पॅनलने सर्वच्या सर्व २९ जागांवर विजय मिळविला.कामगार पॅनलचे विजयी उमेदवारसंघाच्या अध्यक्षपदासाठी प्रथेप्रमाणे मुंबईतील कामगार नेते जे. आर. भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे.कामगार पॅनलचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुदरे (२९८४), जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे (२६९९), खजिनदार उत्तम रकिबे (२३३८). उपाध्यक्ष ४ जागा सुनील अहिरे (२५१८), राजेश टाकेकर (२५९२), केडी पाळदे (२३०१), माधवराव लहामगे (२५७१). जाइंट सेक्रेटरी सहायक जागेसाठी शिवाजी कदम (२३१८), जयराम कोठुळे (२६५१), डी. व्ही. खुर्जूल (२५१२), रमेश खुळे (२३३५), उल्हास भालेराव (२३४७), इरफान शेख (२३०१), कार्यकारी सदस्य १६ जागा, शरद अरींगळे (२५९१), डी. के. गवळी (२४७०), अरुण गिते (२४४१), व्ही. बी. गांगुर्डे (२२१८), पी. बी. घायवटे (२२७०), एस. जी. घुगे (२३६७), एस. एम. चौरे (२३४९), आर. के. जगताप (२४१२), कार्तिक डांगे (२४७९), एस. व्ही. ताजनपुरे (२४७६), एस. व्ही. तेजाळे (२४३१), अविनाश देवरुखकर (२४०९), उल्हास देशमुख (२३९१), डी. एन. दिंडे (२३३६), मनोज सोनवणे (२२८१) मते मिळवून विजयी झाले. कामगार पॅनलचे जगदीश गोडसे व ज्ञानेश्वर जुद्रें यांच्या नेतृत्वाखाली पॅनलच्या समर्थकांनी मध्यरात्रीपर्यंत आतषबाजी, ढोलताशांचा गजरात आनंदोत्सव साजरा केला.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन माधवराव भनगे यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)
आपला पॅनलचा धुव्वा : मुद्रणालय मजूर संघाच्या निवडणुकीत सर्व जागा जिंकल्यात
By admin | Updated: March 16, 2015 01:24 IST