शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस यांच्या उपस्थितीत ध्वजावतरण

By admin | Updated: August 10, 2016 00:31 IST

जय्यत तयारी : प्रशासकीय यंत्रणेकडून आढावा

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याचा समारोप येत्या गुरुवारी (दि.११) रात्री नऊ वाजून ३१ मिनिटांनी होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व वल्लभपीठाचे वल्लभाचार्य महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत कुंभमेळ्याच्या ध्वजावतरण सोहळा पार पडणार आहे. देवी-देवतांची उत्तरपूजा झाल्यानंतर रामकुंडावरील ध्वज खाली उतरविण्यात येणार आहे.सिंहाचा गुरू राशीमध्ये प्रवेश होताच १४ जुलै २०१५ पासून सिंहस्थ कुंभमेळ्याला नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये सुरुवात झाली होती. येत्या अकरा तारखेला नऊ वाजून ३१ मिनिटांनी गुरू सिंहमधून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. याबरोबरच सिंहस्थ कुंभमेळ्याची सांगता होणार असल्याची माहिती गंगा-गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी दिली. गेल्या आठवड्यात आलेल्या महापुराने गोदामाईने धोक्याची पातळी ओलांडली होती. कपालेश्वर महादेव मंदिरापर्यंत गाळाचे साम्राज्य पसरले होते. गंगा-गोदावरीसह सर्वच मंदिरे पाण्याखाली बुडाली होती. यामुळे ध्वजावतरण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाच्या वतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. यामुळे संपूर्ण गाळाचे साम्राज्य संपुष्टात आले असून, गंगा-गोदावरी मंदिरासह रामकुंडाचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. रामकुंड परिसर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजावतरण सोहळ्यासाठी सज्ज करण्यात आला आहे. मंगळवारी (दि.९) जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन्, अतिरिक्त पोलीस महासंचालक एस. जगन्नाथन, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण, आमदार बाळासाहेब सानप, महंत भक्तिचरणदास, मुख्य अग्निशमन अधिकारी अनिल महाजन, शहर अभियंता सुनील खुने, सतीश शुक्ल, पोलीस उपआयुक्त विजय पाटील, लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह सर्व मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाहणी करून सोहळ्याच्या नियोजनाची आखणी केली. (प्रतिनिधी)