शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

ध्वजदिन निधी संकलनात भरीव योगदाने द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : देशाची सीमा सुरक्षित रहावी यासाठी आपले सैनिकसीमेवर आपले कर्तव्य निभावत असतात. कर्तव्य पार पाडताना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : देशाची सीमा सुरक्षित रहावी यासाठी आपले सैनिकसीमेवर आपले कर्तव्य निभावत असतात. कर्तव्य पार पाडताना प्रसंगी आपल्या प्राणांचे बलिदानदेखील देतात. अशा सैनिकांप्रती कृतज्ञता म्हणून साजऱ्या होणाऱ्या सशस्त्र सेना ध्वजदिनाच्या निधी संकलनासाठी समाजातील सर्वच घटकांनी भरीव योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या हस्ते ध्वजदिन २०२० निधी संकलन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सैनिकांप्रती आपली निष्ठा दाखविण्यासाठी ७ डिसेंबरला साजरा होणाऱ्या सशस्त्र सेना ध्वजदिन म्हणून साजरा केला जातो, त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले, जिल्हा सैनिक कार्यालयातील कर्मचारी नवनाथ दाने, संजय थोरात, सुनील पाटील आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, १९४९ पासून प्रत्येक वर्षी ०७ डिसेंबर रोजी सशस्त्र सेना ध्वजदिन साजरा करण्यात येतो. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत या दिवसापासून ध्वजदिन निधी संकलनास प्रारंभ करण्यात येत असतो. संकलित करण्यात येणाऱ्या निधीचा वापर धारातीर्थी पडलेल्या तसेच अपंगत्व आलेल्या सैनिक, युद्धविधवा, माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी करण्यात येतो. या निधीच्या माध्यमातून आपली देशाप्रति असलेली भावना व आदर व्यक्त करण्यासाठीचे साधन म्हणून ध्वजदिन निधी संकलनात सर्वांनी योगदान देणे आवश्यक आहे. त्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी यांनी रुपये पाच हजार, वर्ग १ अधिकारी यांनी तीन हजार व इतर अधिकारी कर्मचारी यांनी त्यांच्या क्षमतेनुसार योगदान द्यावे, असे जिल्हाधिकारी मांढरे यांनी यावेळी सांगितले.

इन्फो

निधी संकलनास प्रारंभ

जिल्हाधिकारी मांढरे यांनी सशस्त्र सेना ध्वजदिनानिमित्त रुपये पाच हजारांचा निधी देऊन ध्वजदिन निधी संकलनास प्रारंभ केला. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी मांढरे यांना तिन्ही दलांचे प्रतीक असलेला ध्वज आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले.