शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पाच गावांना फटका : २० घरांची पडझड; आठ दुकानांचे नुकसान

By admin | Updated: August 3, 2016 22:25 IST

सायखेड्यात पूरस्थिती कायम

कसबे सुकेणे : निफाड तालुक्यातील चांदोरी, सायखेड्यासह गोदाकाठच्या गावांची पूरस्थिती बुधवारीही कायम होती. पुरामुळे या भागाला जोडणारे सर्व रस्ते पाण्याखाली असून, गेल्या ४८ तासांपासून वीजपुरवठा खंडित आहे. दरम्यान, बुधवारीही राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाच्या जवानांनी सायखेडा चौफुलीवर अडकलेल्या डॉक्टरसह नऊ जणांना बाहेर काढले.चांदोरी, सायखेडा, शिंगवे, चाटोरी या गावांची गोदावरीच्या महापुराची स्थिती आज दुसऱ्या दिवशी कायम होती. चांदोरी येथील कोळीवाडा, बसस्थानक, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि बाजारपेठ आजही पाण्याखाली असून, संपूर्ण चांदोरी गावाला पुराचा वेढा पडला आहे. पूरग्रस्तांना माजी आमदार दिलीप बनकर यांनी पिण्याच्या पाण्याच्या पिशव्या तर काही सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या वतीने बिस्कीट आणि पुरी-भाजीची पाकिटे वितरित करण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी राधाकृष्णन, प्रांताधिकारी यांच्यासह विविध अधिकारी, एनडीआरएफच्या जवानांचा ताफा चांदोरीत तळ ठोकून आहे. चांदोरीकडे येणारे बहुतांश रस्ते आजही बंद होते. गावात दोरीच्या साहाय्याने लोक ये - जा करू लागले असून, कोळीवाडा व काही भागात मात्र अद्यापही संपर्क होत नसल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत.सायखेडा येथील गंगा नगर व संपूर्ण बाजारपेठेत पुराचे पाणी आहे. सायखेडा चौफुलीवर बुधवारी दुपारपर्यंत १० फूट पाणी होते. (वार्ताहर)