शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सव कालावधीत पाच हजार टन कचरा

By admin | Updated: September 18, 2016 17:04 IST

संकलन : ना.रोड, पूर्वमध्ये सर्वाधिक कचरा

नाशिक : शहरातून एरवी प्रतिदिन सुमारे ३८० ते ४०० टन कचरा महापालिकेच्या घंटागाड्यांमार्फत उचलला जातो. परंतु, गणेशोत्सव कालावधीत शहरातील सहाही विभागातून सुमारे पाच हजार टन कचरा खतप्रकल्पावर नेण्यात आला आहे. प्रामुख्याने, नाशिकरोड आणि पूर्व विभागातून प्रत्येकी हजार टन कचरा उचलण्यात आल्याची नोंद खतप्रकल्पावर झाली आहे.घंटागाड्यांमार्फत शहरातून दैनंदिन कचरा संकलन केले जाते. दि. ५ ते १५ सप्टेंबर या कालावधीत शहरात गणेशोत्सव साजरा झाला. यंदा गणेशोत्सवात ८५० हून अधिक सार्वजनिक मंडळांनी सहभाग नोंदविला होता. निर्माल्य संकलित करण्यासाठी ठिकठिकाणी निर्माल्य कलश उपलब्ध करून दिले होते. गणेशोत्सवाच्या कालावधीत महापालिकेमार्फत दैनंदिन साफसफाई करण्यात आली असता प्रत्येक दिवशी ४०० ते ४५० टन कचरा उचलण्यात आला. उत्सव काळात विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या आरास बघण्यासाठी नाशिककरांनी तोबा गर्दी केली होती. त्यात ठिकठिकाणी खाद्यपदार्थ, खेळणी व अन्य वस्तू विक्रेत्यांनी दुकाने थाटल्याने घाण-कचऱ्यात मोठ्या प्रमाणावर भर पडली. दि. ५ ते १५ सप्टेंबर या कालावधीत महापालिकेने ४७१९ टन कचरा उचलला. त्यात नाशिक पूर्व विभागातून ९५३ टन, नाशिक पश्चिम - ६१२ टन, नाशिकरोड - ९५३ टन, पंचवटी विभाग - ७८० टन, सिडको विभाग - ८८४ टन तर सातपूर विभागातून ५३४ टन कचरा उचलण्यात आला. (प्रतिनिधी)