शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

निकवेलमध्ये दारू पिणाऱ्यास पाच हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 00:06 IST

निकवेल : येथे मंगळवारी (दि.७) सरपंच चित्रा मोरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा घेण्यात आली. गावात दारू विक्र ीचा व्यवसाय करतील त्यांना १०,००० रु . व गावात जो दारू पिलेला आढळेल त्याला ५,००० रु. दंड करण्याचा निर्णय या ग्रामसभेत घेण्यात आला. ग्रामसभेत आदिवासी महिलांच्या पुढाकाराने झालेल्या या ग्रामसभेत गावात दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देविशेष ग्रामसभा : आदिवासी महिलांच्या पुढाकाराने ग्रामपंचायतीचा ठराव

निकवेल : येथे मंगळवारी (दि.७) सरपंच चित्रा मोरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा घेण्यात आली. गावात दारू विक्र ीचा व्यवसाय करतील त्यांना १०,००० रु . व गावात जो दारू पिलेला आढळेल त्याला ५,००० रु. दंड करण्याचा निर्णय या ग्रामसभेत घेण्यात आला.ग्रामसभेत आदिवासी महिलांच्या पुढाकाराने झालेल्या या ग्रामसभेत गावात दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला. रोजगाराचे कोणतेही साधन नसताना मजुरीसाठी महिलांना दिवसभर काबाडकष्ट करावे लागतात. त्यातच गावात दारूची विक्र ी मोठ्या प्रमाणात केली जात असल्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. घरातील कर्ता पुरु ष दारूच्या आहारी गेल्यामुळे कुटुंबाचा भार महिलांवर पडत आहे.दारूसाठी शेजारच्या गावातील मद्यपीदेखील येऊ लागल्याने गावातील शांतता बिघडल्याचे महिलांचे म्हणणे आहे. युवा पिढी दिवसेंदिवस व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यामुळे अवैध दारू विक्र ीला त्वरित आळा घालावा अशी मागणी महिलांनी ग्रामसभेत केली. निकवेल येथे गेल्या अनेक दिवसांपासून गावठी दारू विक्र ीचा व्यवसाय तेजीत सुरू आहे.त्यामुळे आदिवासी महिलांनी एकत्र येऊन दारूबंदीचा निर्णय घेतला जे गावठी दारूचा व्यवसाय करतात त्यांच्या प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांच्याजवळची दारू व दारू गाळण्याचे साहित्य जमा केले. जे पुन्हा दारू विक्र ीचा व्यवसाय करतील त्यांना १०,००० रु . दंड व गावात जो दारू पिलेला आढळला तर त्याला ५,००० रु. दंड वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी सरपंच चित्रा मोरे, उपसरपंच मुरलीधर वाघ, पोलीसपाटील विशाल वाघ, तंटामुक्ती अध्यक्ष धर्मा महाजन, ग्रामव्यवस्थापन समिती सदस्य संजय सोनवणे, ग्रा. पं. सदस्य रामचंद्र मोरे, तात्या मोरे, दादा माळी, रामू अनारे, बंटी म्हसदे, सोमनाथ बच्छाव, किरण वाघ, देवा वाघ व आदिवासी महिला, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.गावात दारूबंदी करावी यासाठी महिलांनी मागणी केल्यामुळे विशेष ग्रामसभा घेऊन दारूबंदीबाबतचा ठराव महिलांनी मांडला, तो आम्ही एकमताने मंजूर केला व गावात पूर्णपणे दारूबंदी केली आहे.- चित्रा मोरे, सरपंच निकवेल