शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जागा पाच, इच्छुक अनेक!

By admin | Updated: July 9, 2017 00:23 IST

नाशिक : महापालिकेच्या पाच जागांसाठी संख्या तीन आकडी असल्याने कोणाच्या पदरात माप टाकावे याबाबत भाजपात डोकेदुखी वाढली आहे,

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेच्या स्वीकृत सदस्याच्या पाच जागांसाठी इच्छुकांची संख्या तीन आकडी असल्याने कोणाच्या पदरात माप टाकावे याबाबत सत्ताधारी भाजपात डोकेदुखी वाढली आहे, तर शिवसेनेत गटबाजीमुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी थेट संपर्कप्रमुख व पक्षप्रमुखांच्या स्वीय सचिवांकडे इच्छुकांना अर्ज सादर करण्यास सांगितले आहे. दरम्यान, स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीसाठी प्रक्रिया सुरू झाल्याने इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.महापालिकेत भाजपा ६६, शिवसेना ३५, कॉँग्रेस ६, राष्ट्रवादी ६, मनसे ५, अपक्ष ३ आणि रिपाइं १ असे पक्षीय बलाबल आहे. आता पाच स्वीकृत सदस्य नियुक्त करायचे असून, त्यासाठी प्रक्रिया नगरसचिव विभागाने सुरू केली आहे. येत्या ११ जुलैला आयुक्तांकडे सर्व गटनेत्यांची बैठक होणार आहे. एकूण १२२ सदस्यसंख्या असल्याने एका स्वीकृतसाठी २४.४०चा कोटा असणार आहे. त्यामुळे भाजपाचे सर्वाधिक तीन, तर सेनेचे दोन स्वीकृत सदस्य नियुक्त होऊ शकतात, तर कोटा पूर्ण करू न शकणाऱ्या कॉँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, अपक्ष व रिपाइं यांना चालू पंचवार्षिक काळात स्वीकृत सदस्य देण्याची संधी नाही. स्वीकृतसाठी पाच जागांवर सेना-भाजपात मोठ्या प्रमाणावर चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळेच स्वीकृतची निवडप्रक्रिया गेल्या चार महिन्यांपासून लांबली होती. भाजपात तीन जागांसाठी इच्छुकांची संख्या शंभराहून अधिक असल्याचे सांगितले जाते. त्यात काही माजी नगरसेवकांसह त्यांच्या नातेवाइकांचाही समावेश आहे, तर आमदारांनीही आपल्या समर्थकांसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न केल्याचे समजते. त्यामुळे तिढा कायम आहे. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पालकमंत्री गिरीश महाजन आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या निर्णयाकडे आता लक्ष लागून असणार आहे. भाजपात इच्छुकांची संख्या सर्वाधिक असतानाच शिवसेनेतही दोन जागांसाठी चुरस आहे.