शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पाच चंदनचोरट्यांना पिस्तुलासह अटक

By admin | Updated: June 17, 2017 00:36 IST

इंदिरानगर : पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शुक्रवारी (दि़१६) पाथर्डीगाव चौफुलीवर संशयास्पद इंडिकाचा पाठलाग करून चंदन चोरट्यांच्या टोळीच्या जेरबंद केले

लोकमत न्यूज नेटवर्कइंदिरानगर : इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शुक्रवारी (दि़१६) पहाटे पाथर्डीगाव चौफुलीवर संशयास्पद इंडिकाचा पाठलाग करून पाच चंदन चोरट्यांच्या टोळीच्या जेरबंद केले असून त्यांच्याकडून चोरीचे ५० हजार रुपयांचे चंदनाचे लाकूड, पिस्तूल व हत्यारे जप्त केले आहेत़ या पाचही संशयितांवर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़इंदिरानगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम, गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी अजय पगारे, सचिन सोनवणे हे पहाटे सव्वादोन वाजेच्या सुमारास वडनेर गेट ते पाथर्डीगाव चौफुली रस्त्यावर गस्त घालीत होते़ त्यावेळी वडनेर गेटकडून पांढऱ्या रंगाची इंडिका (एमएच १६, एबी १६२३) भरधाव आली़ या इंडिकास थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पाथर्डी गावाकडे पळण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग करून वाहन अडवले़या वाहनातील संशयित सोमनाथ मधुकर कुऱ्हाडे (२८), गणेश भानुदास कुऱ्हाडे (२७), सचिन मधुकर कुऱ्हाडे (२५), अनिल अशोक कुऱ्हाडे (३०), कैलास भानुदास कुऱ्हाडे (२५) या पाच जणांना ताब्यात घेतले़ या संशयितांकडे पिस्तूल, दहा जिवंत काडतुसे तर इंडिकामध्ये चंदनाच्या कापलेल्या झाडाचे लाकूड, झाड कापण्यासाठी करवत, कुऱ्हाडी असे आढळून आले़ या पाचही संशयितांवर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे़