शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

पाच मेंढ्यांसह कोकरूठार

By admin | Updated: September 5, 2015 21:42 IST

जायखेडा : बिजोटे शिवारात हिंस्त्र प्राण्याचा वावर

जायखेडा : बागलाण तालुक्यातील बिजोटे शिवारात दुपारी ४ वाजेच्या सुमारास अज्ञात हिंंस्र प्राण्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करत पाच कोकरांना ठार केले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.बिजोटे शिवारातील पोपट केदा बच्छाव यांच्या गट क्रमांक १६९ मध्ये सोनू पुनाजी गोवेकर यांच्या मेंढ्या काही दिवसांपासून चढाईसाठी बसविल्या आहेत. नेहमीप्रमाणे मेंढ्यांचे कोकरू त्यांच्या बांधलेल्या पालमध्ये सुरक्षित ठेवून मेंढ्यांचा कळप डोंगरकडेला गेला होता. मात्र दुपारी ४ वाजेच्या सुमारास हिंस्र प्राण्याने मेंढ्यांच्या पाच कोकरूंवर हल्ला चढवून त्यांना ठार केले. तसेच एका बोकडाला जखमी केले. याबाबत आखतवाडेचे माजी सरपंच किशोर ह्याळीज यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली. वनविभागाचे वनपाल एल. पी. शेंडगे, वनरक्षक डी. आर. बागुल यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सदर हल्ला हा लांडग्याने केला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. परिसरातील जंगलात बेसुमार होत असलेली वृक्षसंपदा, वनसंपत्तीचा ऱ्हास व पर्जन्यमानाने फिरवलेली पाठ यामुळे येथील जंगलातील वन्यप्राणी पाणी व अन्नाच्या शोधात नागरी वस्तींकडे धाव घेत आहेत. त्यातून अशा दुर्घटना घडण्याचे प्रमाण वाढत आहे. वनविभाग वनसंपत्ती जपण्यासाठी प्रत्यक्ष व प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याऐवजी उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करत आहे. त्यामुळे बागलाण तालुक्यातील वनसंपदा नष्ट होण्यासोबत वन्यप्राण्यांनी नागरी वस्तीवर हल्ले करण्याच्या घटना वाढत आहेत. काही दिवसांपूर्वीच आखतवाडे येथील मुरलीधर निंबा ह्याळीज यांच्या मालकीच्या बकरीस हिंस्र प्राण्याने हल्ला चढवून ठार केले होते. तालुक्यात हिंस्र प्राण्यांचा सुळसुळाट वाढला असून, त्यात मुक्या प्राण्यांना नाहक आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे वनविभागाने वृक्षतोड करणाऱ्यांविरोधात कठारे कारवाई करावी, अशी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)