शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवसाच्या सहा नमुन्यांत पाच बाधित

By admin | Updated: December 25, 2014 01:45 IST

एकाच दिवसाच्या सहा नमुन्यांत पाच बाधित

प्रवीण साळुंके -  मालेगाव येथील महानगरपालिका हद्दीतील डेंग्यू रुग्णांच्या रक्ताचे तपासणीसाठी पाठविलेल्या एकाच दिवसाच्या सहा नमुन्यांपैकी पाच नमुने बाधित असल्याचा अहवाल मिळाला आहे. यामुळे शहरात डेंग्यूच्या आजाराने खोलवर हातपाय पसरले असल्याचे उघड झाले आहे. पाठविलेल्या नमुन्यांत एका दिवसाचे इतके, तर गेल्या चार महिन्यांत किती रुग्णांना डेंग्यूची बाधा झाली असेल, असा प्रश्न विचारला जात आहे. असे असतानाही महानगरपालिकेचे अधिकारी कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना करत नाहीत, हे विशेष. शहरात मोठ्या प्रमाणावर डेंग्यू आजाराने बाधित रुग्ण असून, महानगरपालिका यातील काही रक्ताचे नमुने गोळा करते. हे नमुने तपासणीसाठी धुळे येथील कर्मवीर भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात येतात. येथील महानगरपालिकेने २७ नोव्हेंबर रोजी शहरातील तापाच्या आजाराने बाधित झालेल्या सहा जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा मनपाला अहवाल प्राप्त झाला असून, यातील तब्बल पाच जणांच्या रक्ताचे नमुने डेंग्यूबाधित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यात पाच महिला व एक पुरुष असून, यातील पाच रुग्णांचे वय सात वर्षांच्या आत आहे. या सहापैकी ४४ वर्षीय रहेना या महिलेचा अहवाल बाधित नसून उर्वरित मुन्शीबा (८ महिने), मदिहा (५ वर्षे), अफिया (५ वर्षे), समरीन (७ वर्षे), म. जाहिद (५ वर्षे) यांना डेंग्यू झाल्याचे अहवालात उघड झाले आहे.या एसबीएचजीएमसी/४३९/१४ अहवालावरून शहरात डेंग्यूच्या रुग्णांचा अंदाज येतो. त्यानंतर आरोग्य विभागाने २८ नोव्हेंबरला सलिमा रियाज अहमद (वय ७२) व जव्हेरीया फिरोज अहमद (वय १२) या दोघा महिलांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी धुळे येथे पाठविले होते. त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यापैकी एकीला म्हणजे जव्हेरियाला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. असे असतानाही येथील महानगरपालिका शहरात डेंग्यूची साथ नसल्याचे छातीठोकपणे सांगत आहे, हे विशेष.