शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अधिकाºयासह पाच परिचारिका निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:39 IST

पंचवटीतील महापालिकेच्या मायको रुग्णालयात अधिकारी व कर्मचाºयांच्या बेजबाबदारपणामुळे एका महिलेची रिक्षातच प्रसूती होण्याच्या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेत आॅन ड्यूटी गायब असलेल्या वैद्यकीय अधिकाºयासह कर्तव्यात कसूर करणाºया पाच परिचारिकांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. या साºया प्रकरणाचा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशान्वये सदर कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

नाशिक : पंचवटीतील महापालिकेच्या मायको रुग्णालयात अधिकारी व कर्मचाºयांच्या बेजबाबदारपणामुळे एका महिलेची रिक्षातच प्रसूती होण्याच्या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेत आॅन ड्यूटी गायब असलेल्या वैद्यकीय अधिकाºयासह कर्तव्यात कसूर करणाºया पाच परिचारिकांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. या साºया प्रकरणाचा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशान्वये सदर कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.  सोमवारी (दि.२३) पंचवटीतील मायको रुग्णालयात वैद्यकीय अधिकाºयासह कोणीही कर्मचारी हजर नसल्याने वेळेवर मदत न मिळल्याने एका महिलेची प्रसूती रिक्षातच झाली होती. या साºया प्रकाराची गंभीर दखल घेत वैद्यकीय विभागाने वैद्यकीय अधिकारी डॉ. आरती चिरमाडे यांना चौकशी करण्याचे आदेशित केले होते. त्यानुसार, डॉ. चिरमाडे यांनी आपला अहवाल वैद्यकीय अधीक्षकांना सादर केला आहे. या चौकशी अहवालानुसार, सदर महिला सर्वप्रथम सकाळी ११.३० वाजता रुग्णालयात आली होती परंतु, इन्चार्ज सिस्टर श्रीमती सरला रुपवते यांनी तिची तपासणी करून घरी पाठवून दिले आणि पोटात कळा येतील त्यावेळी पुन्हा येण्यास सांगितले. त्यानुसार, दुपारी पुन्हा महिला रुग्णालयात आली असता वैद्यकीय अधिकाºयासह आया, कर्मचारी कुणीही तेथे हजर नव्हते. सुरक्षा रक्षक रुग्णालयाच्या गच्चीवर पतंग उडविण्यात मश्गुल होता.सुरक्षा रक्षकांच्या बडतर्फीची शिफारसमायको रुग्णालयात एक पुरुष व एक महिला सुरक्षा रक्षक आहेत. सदर घटना घडली त्यावेळी सुरक्षा रक्षक भरत गायकवाड हा रुग्णालयाच्या गच्चीवर पतंग उडवित होता तर महिला सुरक्षा रक्षक लक्ष्मी निकम या जेवणासाठी घरी गेल्या होत्या. सदर कंत्राटी सुरक्षा रक्षकांच्या बडतर्फीची शिफारस वैद्यकीय अधीक्षकांनी प्रशासन उपआयुक्तांकडे केली आहे. दरम्यान, श्रीमती भारती कोठारी व श्रीमती ए. के. देशमुख या कुठलाही अर्ज न देता गैरहजर होत्या. मात्र, आॅन ड्यूटी त्या गायब होत्या की त्यांची नेमणूक अन्य कोठे होती, याचीही चौकशी केली जाणार आहे.चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या आदेशान्वये वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. हिरामण कोकणी यांच्यासह श्रीमती भारती कोठारी, श्रीमती ए. के. देशमुख, श्रीमती मनीषा शिंदे, श्रीमती सरला रुपवते, श्रीमती एम. एम. ठाकूर या परिचारिकांच्या निलंबनाचे आदेश काढले.