शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

जिल्ह्यात दोन अपघातात पाच ठार

By admin | Updated: January 14, 2017 01:14 IST

तीन युवकांच्या मृत्यूने कसबे सुकेणेवर शोककळा

नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये पाच जण ठार झाले, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.मुंबई - आग्रा महामार्गावर कोकणगाव फाटा येथे कसबे सुकेणे येथील रहिवासी असलेले तिघेजण पिंपळगाव बसवंत येथे एका खाजगी कंपनीत पहाटे ५.४५ वाजता मोटारसायकलने कामाला जात होते. महामार्ग ओलांडताना पिंपळगाव बसवंतहून नाशिककडे जाणाऱ्या लक्झरी बसने मोटारसायकलला धडक दिल्याने मोटारसायकलवरील सचिन वसंत मुंजे (२१), दत्ता अशोक सूर्यवंशी (२८), योगेश मंगळू पवार (२७) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत पिंपळगाव बसवंत पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून, वाहनाचा शोध सुरू आहे. दुसरा अपघात सटाणा - ताहाराबाद मार्गावर वनोली गावाजवळ शुक्रवारी सकाळी झाला. ट्रक व ट्रेलर यांच्यात समोरासमोर धडक होऊन दोन जणांचा जागीच मृत्यु झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले.विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरील वनोली गावालगत असलेल्या यूटर्नवर सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ट्रक (क्र ं.एमडब्लूए ७४११) व ट्रेलर (क्र ं आरजे ५१ जी १०८)यांच्यात समोरासमोर भीषण धडक होऊन दोन्हीही वाहन चालकांचा जागीच मृत्यु झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले असून अधिक उपचारासाठी त्यांना मालेगाव येथे पाठवण्यात आले आहे.दौलत रामचंद्र साबळे (५०, रा. देवगाव , ता.निफाड) व परमेश्वर जाट (४७, रा.भिलवाड राज्यस्थान) ही मृतांची नावे आहेत.नगर जिल्ह्यातील कारखान्यासाठी ताहाराबाद परिसरातून उस घेऊन जाणारा ट्रक व सटाणा शहराकडून राज्यस्थानकडे जाणारा ट्रेलर होता.अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचायत समितीचे उपसभापती वसंत भामरे यांनी सटाणा पोलिस स्टेशनला घटनेची माहिती देवून जखमींना तात्काळ मदत उपलब्ध करु न दिली. तर मृतदेह ग्रामीण रु ग्णालयात पाठविण्यात आले. पोलिस प्रशासनाने अपघातग्रस्त वाहने बाजूला करु न महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा करु न दिला. सटाणा पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.