शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

बागलाणमध्ये पाच हॉट स्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 17:39 IST

सटाणा : कोरोनाचा मालेगावात शिरकाव झाल्याने प्रशासकीय यंत्रणा चांगलीच हादरली आहे. कोरोनाला तोंड देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असुन संभाव्य संशयित आणि बाधित रु ग्णांसाठी सटाणा शहरासह तालुक्यात पाच ठिकाणी साडेसातशे रु ग्णांसाठी विलगीकरण केंद्र उभारण्यात आली आहेत.

ठळक मुद्देसंभाव्य अन् बाधित रु ग्णांसाठी पाच विलगीकरण केंद्र ; ७५०खाटांची व्यवस्था

सटाणा : कोरोनाचा मालेगावात शिरकाव झाल्याने प्रशासकीय यंत्रणा चांगलीच हादरली आहे. कोरोनाला तोंड देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असुन संभाव्य संशयित आणि बाधित रु ग्णांसाठी सटाणा शहरासह तालुक्यात पाच ठिकाणी साडेसातशे रु ग्णांसाठी विलगीकरण केंद्र उभारण्यात आली आहेत.बागलाण तालुक्यात कोरोना संशयित रु ग्णांसाठी यापुर्वी सटाणा, नामपूर आणि डांगसौंदाणे या तिन्ही ग्रामीण रु ग्णालयात प्रत्येकी दहा खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.दरम्यान गेल्या दोन दिवसांपूर्वी सटाण्यापासून अवघ्या ३४ किलोमीटर अंतरावरील मालेगाव शहरात कोरोना बाधित रु ग्णाचा मृत्यू झाल्याबरोबरच बाधित रु ग्ण सापडल्याने संपूर्ण कसमादे परिसर हादरून गेला आहे. गावागावात कडकडीत बंद पाळला जात आहे. दोन दिवसांपासून मालेगावात रु ग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.त्या पाशर््वभूमीवर प्रशासनाने तत्काळ संभाव्य रु ग्ण आणि संशयित रु ग्णांसाठी विलगीकरण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शहरी आणि ग्रामीण असे दोन भाग पाडण्यात आले आहेत.शहरासाठी तीन ठिकाणी तर ग्रामीणसाठी दोन ठिकाणी असे पाच विलगीकरण केंद्र उभारण्यात आले आहेत. याच्यात तब्बल साडेसातशे रु ग्णाची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रांमध्ये स्वयंपाक गृह, पाणी, स्वच्छता गृह, विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे.मालेगावच्या लोंढ्यामुळे पाच हॉट स्पॉट...संचारबंदी लागू असतांनाही पोलीस यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे लॉक डाऊन काळात सटाणा शहरासह अंतापूर, नामपूर, जायखेडा, ताहाराबाद येथे मालेगाव येथून लोंढेच्या लोंढे येत होते. दरम्यान दोन दिवसांपासून मालेगावात कोरोनाच्या रु ग्णांमध्ये वाढ झाल्याने मालेगाव बहुतांश रहिवाशी ग्रामीण रस्त्यांचा शोध घेऊन नातेवाईकांचा आश्रय घेत आहेत.त्यामुळे शेकडो लोक संपर्कात आल्यामुळे या पाच गावांकडे आजतरी हॉट स्पॉट म्हणून पहिले जात आहे. त्यातच सटाणा शहरात न्हावीगल्ली, पाटोळे गल्लीत, पुंडलिकनगर येथे दहा जणांना विलगीकरणचा शिक्का मारला असतांनाही हे दहा जण नियमांचे पालन न करता राजरोसपणे शहरातून फिरत असल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.सटाणा शहरातील अपंग कल्याण केंद्र, देवमामलेदार यशवंतराव महाराज देवस्थान ट्रस्ट, श्री शिवछत्रपती मराठा मुलींचे वस्तीगृह तसेच अजमिर सौंदाणे येथील शासकीय एकलव्य मॉडेल स्कूल, ताहाराबाद येथील सिद्धी इंग्लिश मेडियम स्कूल या ठिकाणी संभाव्य व संशयित रु ग्णांसाठी प्रत्येकी १५० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी लागणाऱ्या सर्व बाबींची व्यवस्था करण्याचे आदेश संबधित यंत्रणेला दिले आहेत.- जितेंद्र इंगळे पाटील, तहसीलदार, बागलाण.मालेगाव शहरात कोरोना बाधितांची संख्या ही बागलाणसाठी धोक्याची घंटा आहे. या पाशर््वभूमीवर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी बागलाणवासियांनी लॉक डाऊनच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने घरातून बाहेर पडू नये तसेच बाहेरच्या नागरिकाच्या संपर्कात येऊ नये तसेच बाहेरगाव पाहुण्यांना देखील कोणीही आश्रय देणे लॉक डाऊनच्या काळात गुन्हा आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने कोरोनाचा शिरकाव रोखाण्याठी तत्पर राहावे.- दिलीप बोरसे, आमदार,बागलाण.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक