शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव शहरात पाच दिवस जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 00:28 IST

पिंपळगाव बसवंत : जिल्ह्यातील महत्त्वाची व्यापारी बाजार पेठ असलेल्या पिंपळगाव बसवंत शहरात मार्च महिन्याप्रारंभीपासून कोरोना बधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी पिंपळगाव बसवंत शहरात बुधवार दि. ७ एप्रिलपासून ते ११ एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता पाच दिवसांचा कडकडतीत जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने शनिवारी (दि. ३) बैठकीत घेतला आहे.

ठळक मुद्देअत्यावश्यक सेवा वगळता पाच दिवसांचा कडकडतीत जनता कर्फ्यू

पिंपळगाव बसवंत : जिल्ह्यातील महत्त्वाची व्यापारी बाजार पेठ असलेल्या पिंपळगाव बसवंत शहरात मार्च महिन्याप्रारंभीपासून कोरोना बधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी पिंपळगाव बसवंत शहरात बुधवार दि. ७ एप्रिलपासून ते ११ एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता पाच दिवसांचा कडकडतीत जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने शनिवारी (दि. ३) बैठकीत घेतला आहे.शहरात कोरोना बधितांची वाढती संख्या लक्षात घेता यावर नियंत्रण व उपाययोजनासाठी शहरातील अग्निशामक विभाग कार्यालयात ग्रामपालिका प्रशासन, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक व्यापारी यांच्यात बैठक पार पडली. यावेळी ग्रामपालिका सरपंच सुहास मोरे, सदस्य गणेश बनकर, विश्वास मोरे, संजय मोरे, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे, मंडळ अधिकारी नीलकंठ उगले, किरण लभडे, अल्पेश पारख, बापू कडाळे, सुरेश गायकवाड, बाळा बनकर, दीपक विधाते, ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम आदींसह शहर व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.ग्रामपालिका, महसूल, पोलीस प्रशासनासह स्थानिक व्यापारी वर्गाच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत पिंपळगाव शहरातील वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्याबाबत व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत चर्चा करण्यात अली.व्यापारी वर्गाने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना नो मास्क, नो एन्ट्री, फिजिकल डिस्टनसिंगचे व कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या. शिवाय सर्वानुमते झालेल्या चर्चेअंती शहरात बुधवारपासून ते रविवारपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता ५ दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. जनता कर्फ्यूच्या निर्णयास सर्व व्यापाऱ्यांनी एकमत दर्शविल्याने बंद काळात पिंपळगावकरांनी घराबाहेर न पडता प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने यावेळी केले. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसPolice Stationपोलीस ठाणे