शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन

By admin | Updated: September 21, 2015 23:29 IST

गजबजला गोदाघाट : ‘सुखकर्ता- दुखहर्ता’चे घुमले स्वर

नाशिक : ‘सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची...’ या गणरायाच्या आरतीच्या स्वरांनी गोदाकाठ दुमदुमला होता. निमित्त होते, पाच दिवसांच्या गणपतीसह गौरी विसर्जनाचे! बहुसंख्य गणेशभक्तांनी आज आपल्या लाडक्या बाप्पाला पाच दिवसांच्या आराधनेनंतर भावपूर्ण निरोप दिला. पाच दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यासाठी दुतोंड्या मारुतीपासून तर गोदावरी-कपिला त्रिवेणी संगमापर्यंत गोदाघाट परिसरात भाविकांची संध्याकाळी गर्दी झाली होती. गणेशभक्त आपल्या कुटुंबीयांसमवेत मोठ्या भक्तिभावाने गोदाघाटावर येऊन गणेशमूर्तीची आरती क रत विसर्जन करत होते. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...’ अर्धा लाडू फुटला गणपती बाप्पा उठला’, ‘एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार...’ असा जयघोष करत नदीपात्रात तरुणांनी उतरून बाप्पाला निरोप दिला. दरम्यान, काही कु टुंबीयांनी गोदाघाटावर वाजत-गाजत जल्लोषात गणरायाची छोटेखानी मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला. गौरी पटांगण, रोकडोबा घाट, टाळकुटेश्वर घाट, लक्ष्मीनारायण घाट, गोदावरी-कपिला संगम आदि ठिकाणी भाविकांनी पाच दिवसांच्या गणरायांचे विसर्जन करण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले.गेल्या गुरुवारपासून (दि.१७) बाप्पांचे घरोघरी आगमन झाले होते. काही भाविकांनी दीड-दोन, पाच, सात दिवसांपर्यंत तसेच बहुसंख्य गणेश भक्तांच्या घरी बाप्पा अनंत चतुर्थीपर्यंत मुक्कामी राहणार आहेत. ज्या भक्तांनी पाच दिवसांपर्यंत गणपतीची प्रतिष्ठापना केली होती त्यांनी आज विधिवत गोदापात्रात गणरायाचे विसर्जन केले.