शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपात प्रवेश करूनही पाच नगरसेवकांना ठेंगा !

By admin | Updated: February 4, 2017 01:30 IST

उमेदवारी वाटप : चौदा नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करत भाजपात दाखल झालेल्या पाच नगरसेवकांना भाजपाने उमेदवारी नाकारत ठेंगा दाखविला आहे. मात्र, पक्षबदलू १४ नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी देत निवडणूक रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे, संबंधित नगरसेवकांच्या प्रभागात भाजपाला बंडखोरीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी मिळविण्यासाठी सेना-भाजपात मोठ्या प्रमाणावर उड्या पडल्या. अनेक नगरसेवकांनी आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत सेना-भाजपात प्रवेश केला. भाजपात प्रामुख्याने, मनसेच्या नगरसेवक डॉ. दीपाली कुलकर्णी, वंदना शेवाळे, सुनीता मोटकरी, माधुरी जाधव, अर्चना थोरात, शशिकांत जाधव, सतीश सोनवणे, संगीता गायकवाड, सुदाम कोंबडे, रुची कुंभारकर, रेखा बेंडकुळे तसेच कॉँग्रेसचे शिवाजी गांगुर्डे, लता पाटील, उद्धव निमसे, शिवसेनेच्या कोमल मेहरोलिया, अपक्ष पवन पवार व दामोदर मानकर याशिवाय स्वीकृत सदस्य हरिश लोणारी व सचिन महाजन यांनी प्रवेश केला होता. या सर्व उमेदवारांना तिकिटे देण्याचे आश्वासन पक्षश्रेष्ठींनी दिल्याचा दावा संबंधित नगरसेवकांनीच केला होता. शुक्रवारी (दि.३) भाजपाने आपल्या उमेदवारांची अंतिम यादी घोषित केली असता त्यात मनसेच्या वंदना शेवाळे व सुनीता मोटकरी तसेच अपक्ष पवन पवार, स्वीकृत सदस्य हरिश लोणारी व सचिन महाजन यांचा उमेदवारी वाटपात पत्ता कट केला आहे. पवन पवार यांनी मात्र अपक्ष म्हणून प्रभाग १८ मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यांच्या विरोधात भाजपाने प्रा. शरद मोरे यांनी उमेदवारी दिली आहे. भाजपात दाखल झालेल्या उद्धव निमसे, रूची कुंभारकर, दामोदर मानकर, रेखा बेंडकुळे, शशिकांत जाधव, शिवाजी गांगुर्डे, माधुरी जाधव, अर्चना थोरात, कन्हैया साळवे, संगीता गायकवाड, कोमल मेहरोलिया, डॉ. दीपाली कुलकर्णी, सतीश सोनवणे व सुदाम कोंबडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या नगरसेवकांच्या प्रभागात निष्ठावंतांची भूमिका महत्त्वाची ठरणार असून, बंडखोरीची शक्यता आहे. (प्रतिनिधी)